वीज ग्राहकांना अतिरिक्त बिलाचा ‘शॉक’; रीडिंग एजन्सीच्या चुकांचा भुर्दंड

वीज ग्राहकांना अतिरिक्त बिलाचा ‘शॉक’; रीडिंग एजन्सीच्या चुकांचा भुर्दंड
mahavitaran light bill
mahavitaran light billmahavitaran light bill
Updated on

भुसावळ (जळगाव) : फेब्रुवारी, मार्च, एप्रिल २०२१ देयकात श्रीनगर, खळवाडी, हुडको कॉलनी, भोईनगर, कांशिरामनगर विभागातील अनेक वीज ग्राहकांना मे महिन्यात ‘महावितरण’ने (mahavitaran) अतिरिक्त बिलाचा ‘शॉक’ दिला आहे. एजन्सीने ग्राहकांना वेळेत देयक सादर केले नाही व रीडिंगमध्येही (meter reading) वारंवार चुका केल्या आहेत. यासंदर्भात वारंवार तक्रारी करून देखील पुन्हा तोच पाढा गिरवत असल्याने ग्राहकांना आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे. त्यामुळे संबंधित एजन्सीवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली जात आहे. (mahavitaran costmer light bill costmer complant)

mahavitaran light bill
शहरातील नागरिकांची लसीकरणासाठी ग्रामीण भागाकडे धाव

वीज ग्राहकांनी मार्च महिन्यातच याबाबत कार्यालयात तक्रार दाखल केली होती. यात नलिनी अरुण तळेले, धनंजय सोनवणे, चंद्रकांत पाटील, काशिनाथ गुळवे, मधुसूदन ढाके, अशोक सोनवणे, ज्ञानदेव गुळवे, मुरलीधर महाजन, अरुण लोखंडे, राधाबाई सोनवणे, काशिनाथ गुळवे, धनेश पाटील व इतर अनेक ग्राहकांना चुकीचे रीडिंग पाठवून अतिरिक्त रक्कम आकारली आहे.

अनेक वेळा तक्रारी केल्या. कर्मचारी येतात सुधारित बिल देतात. परंतु पुढच्या महिन्यात पुन्हा तिच परिस्थिती निर्माण होते. आधी जिनस मीटर कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी चुका केल्या आता रीडिंग एजन्सी चुका करतेय. घर बंद असताना सुद्धा १००० अतिरिक्त रीडिंग टाकले जाते.

- अरुण तळेले, वीज ग्राहक, श्रीधरनगर, भुसावळ

ग्राहकाने मोबाईलवरून तक्रार केल्यास ती लवकर दुरुस्त होत नाही. आधी बिल भरा, मग तक्रार सोडवू, असे सांगितले जाते. चूक एजन्सी करते, महावितरण कर्मचारी आणि ग्राहकांना हेलपाट्या होतात. अचूक बिल दिली पाहिजे, समस्या वेळेवर सुटल्यास ग्राहकांना कार्यलयात जावे लागणार नाही.

-प्रा. धीरज पाटील, शिवसेना तालुका संघटक, भुसावळ.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.