प्री-वेडिंग शूटमध्ये जुनं ते सोनं ट्रेंडची एंट्री!

प्री-वेडिंग शूटमध्ये जुनं ते सोनं ट्रेंडची एंट्री!
pre wedding photoshoot
pre wedding photoshootpre wedding photoshoot
Updated on

अमळनेर (जळगाव) : सध्याच्या तरुणाईला 'प्री-वेडिंग'चे वेड (pre wedding photoshoot) लागलेले आहे. लग्नाआधीच्या या ‘शूट’मध्ये नववधू- वरासाठी फिल्मी दुनिया वास्तवात उतरवण्याचा रोमँटिक ट्रेड सुरू आहे. मात्र या ट्रेंडला तिलांजली देत 'प्री-वेडिंग' शूट मध्ये "जुनं ते सोनं" म्हणण्याची वेळ आली आहे. नव- वधूची "पारंपरिक धनगरी वेशभूषा" ही (Traditional Dhangari costumes) चर्चेचा विषय ठरत असून सोशल मीडियावर (Social media) मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. (marriage-pre-wedding-photoshoot-dhangar-costumes)

वर्डी (ता चोपडा) येथील रहिवासी तथा नायगाव हायस्कूलचे शिक्षक योगराज माधवराव नायदे व धानोरा हायस्कूलच्या शिक्षिका योगिता बाविस्कर यांचा मुलगा इंजिनिअर प्रफुल्ल नायदे यांचा विवाह शिरूड (ता. अमळनेर) येथील रहिवासी तथा गणित मंडळाचे तालुकाध्यक्ष डी. ए. धनगर (सांगोरे) यांची मुलगी इंजिनिअर जिज्ञासा सांगोरे यांच्याशी निश्चित करण्यात आला आहे. कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर विवाह कमी लोकांच्या हजेरीत जरी साध्या पद्धतीने करायचे असले तरी लग्नाचे प्री- वेडींग शुट करण्याची कल्पना दोघांच्या डोक्यात होती.

धनगराच्या वेशभुषेला प्राधान्य

हौस पूर्ण करण्यासाठी माध्यमिक शिक्षक असलेल्या दोघांच्या वडिलांनी पारंपरिक धनगरी वेशभूषेला सहकार्य केले. पुण्यश्‍लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या सारख्या व्यक्तिमत्त्वातून प्रेरणा घेतली असून सामाजिक जाण- भान, जोडीदार विषयी प्रतिष्ठा- सन्मान ठेवत आपली संस्कृती जोपासली आहे. प्री वेडींग शुट करताना दोघांनीही धनगराची वेशभुषा करत हातात बकरी घेवून शुट केले आहे. या प्री वेडिंग शूटमध्ये आदर्श, मुल्य, एकमेकांप्रतीचा, समाजाप्रतिचा डोळ्यासमोर ठेवून जगण्याचा प्रयत्न मात्र आयुष्यभर करू असा संकल्प नव वधू- वरानी घेतला आहे. आई- वडिलांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी दोघे कटिबद्ध असून सामाजिकतेची जान ठेवतात. शूटिंग दरम्यान दोघांनी एकमेकांचे स्वतंत्र अस्तित्व जपले. अतिशय परिपक्वता, सामंजस्य, एकमेकांप्रती सन्मान, एकमेकांची स्वतंत्र अस्तित्व ही जाणून घेतले हे विशेष!

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.