मुक्ताईनगर (जळगाव) : येथील तहसील कार्यालयात आमदार चंद्रकांत पाटील (MLA Chandrakant patil) यांनी शहरातील चारही बाजूला असलेल्या अतिक्रमित घरे, रहिवास प्रयोजनार्थ असलेली सर्व निवासी घरे २०१८ च्या शासन नियमानुसार नियमाकुल करण्याविषयी अधिकाऱ्यांची बैठक घेऊन योग्य त्या सूचना (Muktainagar palika) दिल्या. त्यामुळे नागरिकांना दिलासा मिळाला आहे. (-mla-chandrakant-patil-order-muktainagar-Encroached-homes-will-be-regular)
मुक्ताईनगर शहरात अनेक वर्षांपासून चारही बाजूला बहुजन समाजातील नागरिकांनी अतिक्रमण करून बांधलेली घरे आहेत. आजही ते कुटुंबासह कायम वास्तव्य करून राहत आहेत. नगरपंचायत भोगवट्यात सदर नोंद असून, ती कायमस्वरूपी नियमित करून देण्यासाठी तहसीलदारांच्या दालनात आमदार चंद्रकांत पाटील यांनी अधिकाऱ्यांची बैठक घेऊन त्यांना शासनाच्या जीआरची माहिती दिली. तत्काळ शहराचा सर्व्हे करावा व मोजमाप करून प्रस्ताव तयार करून वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे पाठविण्याविषयी सूचना केल्या.
बैठकीस तहसीलदार श्वेता संचेती, प्रभारी मुख्याधिकारी शेख साहेब, भूमिअभिलेखचे श्री. नागरे, पंचायत समितीचे आर. एल. जैन, विस्ताराधिकारी, विविध प्रभागाचे नगरसेवक, माजी पोलिसपाटील मोहन मेढे, ग्रामीण भागातील सामाजिक कार्यकर्ते, सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, रहिवासी जगदेव इंगळे, सुशीला इंगळे, प्रमिला तायडे, उमाबाई गोसावी, आशा तायडे, वच्छलाबाई सावळे आदी उपस्थित होते. अतिक्रमणधारकांचा प्रश्न मार्गी लावल्याबद्दल आमदार चंद्रकांत पाटील यांचे माजी पोलिसपाटील मोहन मेढे यांनी आभार मानले.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.