‘म्युकरमायकोसिस’वरील उपचारासाठी स्वतंत्र वॉर्ड

‘म्युकरमायकोसिस’वरील उपचारासाठी स्वतंत्र वॉर्ड
jalgaon civil hospital
jalgaon civil hospitaljalgaon civil hospital
Updated on

जळगाव : कोरोनादरम्यान व कोविडपश्‍चात (Coronavirus) उद्‌भवणाऱ्या ‘म्युकरमायकोसिस’ (mucormycosis cases) या जीवघेण्या आजारावरील उपचारासंदर्भात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात (Jalgaon medical collage) स्वतंत्र कृती दल स्थापन करण्यात आले आहे. रुग्णांसाठी स्वतंत्र वॉर्ड व उपचाराबाबत दिशानिर्देशही देण्यात आले आहेत. या दलाची आज पहिलीच बैठक होऊन संबंधित विभागांवर जबाबदारी सोपवत सूचना देण्यात आल्या. (mucormycosis cases are there in jalgaon medical collage special ward)

या घातक आजाराबाबत कृती दल नेमण्याचे आदेश अधिष्ठाता डॉ.जयप्रकाश रामानंद यांनी दिले होते. त्यानुसार या कृती दलाची पहिली बैठक गुरुवारी झाली. बैठकीत विविध सूचना देण्यात येऊन नियोजन करण्यात आले.

jalgaon civil hospital
सामान्यांचे घरकुलाचे स्वप्नही आवाक्याबाहेर

यांचा आहे समावेश

या कृती दलाचे अध्यक्ष अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद डॉ. मारुती पोटे, डॉ. भाऊराव नाखले, डॉ. विजय गायकवाड, कान-नाक-घसा विभागाचे डॉ.हितेंद्र राऊत, नेत्रशल्यचिकित्सा विभागाचे प्रमुख डॉ. प्रसन्ना पाटील, डॉ. इम्रान पठाण, डॉ. किशोर इंगोले, डॉ. भारत घोडके, डॉ. उत्कर्ष पाटील, डॉ. योगिता बावस्कर, डॉ. बाळासाहेब सुरोशे, डॉ. इमरान तेली यांचा समावेश आहे.

स्वतंत्र वॉर्ड स्थापन

याकरिता स्वतंत्र कक्ष तयार करून तेथे म्युकरमायकोसिस या आजारावर तज्ज्ञ मार्गदर्शकांच्या मार्गदर्शनाखाली उपचार केले जाणार आहे. तसेच नागरिकांमध्ये जनजागृती व रुग्णांच्या नातेवाईकांना जनशिक्षण दिले जाणार आहे. लक्षणे जाणवत असतील तर रुग्णांनी तपासणी करावी असे आवाहन करण्यात येत आहे.

jalgaon civil hospital
नाव त्‍याचे पारदर्शी..त्‍यात किर्तनकाराचा मुलगा; पण त्‍याचा कारनामा मोठाच

अशी असेल जबाबदारी

म्युकरमायकोसिस आजाराविषयी माहिती अद्ययावत ठेवणे याबाबत औषधवैद्यकशास्त्र विभाग, औषधी उपलब्ध करून घेण्याची जबाबदारी औषधशास्त्र विभाग, नोंदी ठेवण्याची जबाबदारी जनऔषध वैद्यकशास्त्र, उपचारासाठी कान-नाक-घसा, दंतशास्त्र, नेत्रशल्य विभागाकडे देण्यात आली आहे. विषाणूंचा अभ्यास करण्याची जबाबदारी सूक्ष्मजीवशास्त्र विभागाकडे देण्यात आली आहे.

असा आजार अशी लक्षणे

‘म्युकरमायकोसिस’ हा बुरशीजन्य रोग आहे. रोगप्रतिकारकशक्ती कमी झाल्यामुळे होण्याची शक्यता असते. डोळा सुजणे, चेहरा दुखणे, दातात वेदना होणे, डोळ्यांचे दुखणे, डोळ्यासमोर अस्पष्ट दिसणे, नाक दुखणे अशी लक्षणे या आजाराची आहे. हा आजार मधुमेही, टॉसिलीझुमेब व इटोलीझुमेब इंजेक्शन घेतलेले, अधिक दिवस ऑक्सिजन अथवा व्हेंटिलेटरवर असणारे रुग्ण, स्टेरॉईडद्वारे उपचार घेतलेले रुग्ण यांना होण्याची शक्यता असते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()