दादर कापणीच्या वेळी आढळले बिबट्याचे तीन बछडे

Leopard calves
Leopard calves
Updated on

नांद्रा (जळगाव) : पाचोरा तालुक्‍यातील नांद्रा परिसरालगतच्या वनविभागाला लागुन असलेल्या संजय तावडे यांच्या गट.न.175 मध्ये शेतात आज दादर पिकाची कापणीचे काम सुरू होते. परंतु दादर कापत असताना मजुरांना येथे बिबट्याचे तीन बछडे आढळून आल्‍याने मजुरवर्ग काम सोडून पळाले.

शेतात सकाळी मजुर व मालक दादर पिकाची कापणीच्या कामासाठी गेले. कापणीला सुरवात झाल्‍यानंतर मजुरांना दादर पिकात बिबट्याचे तीन बछडे आढळून आल्याने मजुरांमधे एकच घबराट पसरली. सदरचा परिसर वनविभागाला लागुन असल्यामुळे या ठिकाणी शेतकऱ्यांना बिबट्याचे वारंवार दर्शन होत असते. आज प्रत्‍यक्ष बछडे आढळून आल्याने भागात बिबट्याचे वास्तव्य असल्याचा पुरावा मिळाला.

वन विभागाचे पथक दाखल
सध्या रब्बी पिकाची कामे सुरू असल्यामुळे शेतकरी वर्ग दुपारी दोनपर्यत शेतातील कामे करण्यासाठी शेतात असतात. यातच दादरची कापणीची लगबग सर्वत्र सुरू असून सकाळी अकराच्या सुमारास हे बछडे आढळून आल्याने शेतकरी भुषण तावडे यांनी याबाबत वनविभागाला कळवले. घटनास्थळी पाचोरा वनक्षेत्रपाल डि. एस. देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली वनपाल सुनील भिलावे, वनरक्षक जगदीश ठाकरे, अमृता भोई, ललीत पाटील, प्रकाश सुर्यवंशी, रामसिंग जाधव, राहूल कोळी, सचिन कुमावत यांच्या टिमने घटनास्थळी धाव घेऊन संपुर्ण परीसर निर्मनुष्य करुण पुर्णरमिलनासाठी लांब थांबुन लक्ष ठेऊन आहेत.

परिसरावर नजर
बिबट्याचे बछड आढळून आल्‍याने दादर कापणीचे काम थांबविण्यात आले असून, संपुर्ण परिसर निर्मनुष्‍य करण्यात आला आहे. बछडे आहेत तिथेच राहू देण्यात आले असून, त्‍यांना घेण्यासाठी मादी बिबट्या येणार यावर लक्ष ठेवण्यासाठी पथक थांबून आहे. तसेच येथे कॅमेरे देखील लावण्यात आले आहेत.

संपादन ः राजेश सोनवणे
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.