भडगाव/पाचोरा (जळगाव) : आमदार किशोर पाटील यांनी कोरोनासह ग्रामस्थांच्या समस्या गावपातळीवरच सोडविण्यासाठी ‘आमदार आपल्या दारी’ हा उपक्रम हाती घेतला आहे. येत्या शुक्रवारपासून (ता.२५) जूनपासून मतदारसंघातील प्रत्येक गावाला ते भेट घेऊन आढावा घेणार आहेत. त्यांच्यासोबत तालुकास्तरावरील सर्व प्रशासकीय यंत्रणा सोबत राहणार आहे. (pachora-mla-kishor-patil-village-to-village-tour-aamdar-aaplya-dari)
'आमदार आपल्या दारी' उपक्रमांतर्गत गावातील कोरोना, घरकुल योजना, कृषी, पीककर्ज, विकासकामे, शिक्षण, वीज, रेशन वाटप आदी बाबींचा आढावा घेणार आहेत. दौऱ्यात तालुकास्तरावरील सर्व अधिकारी, स्थानिक यंत्रणा, सभापती, पंचायत समिती सदस्य उपस्थित राहणार आहेत. तर गावात ग्रामपंचायत, विविध कार्यकारी सोसायटीचे पदाधिकारी उपस्थित असतील. आमदार पाटील हे ग्रामस्थांच्या समस्या ऐकून घेऊन त्याबाबत प्रशासकीय यंत्रणेला सूचना देणार आहेत. तर पुढच्या दोन - तीन महिन्यात पुन्हा दौरा काढून मागील दौऱ्याचा आढावा घेणार आहेत.
असा असेल दौरा
शुक्रवारी (ता. २५) : वाडे, बाबंरूड प्र. ब., नावरे, गोंडगाव, सावदे, घुसर्डीला दौरा असणार आहे. शनिवार (ता. २६) : लोणपिराचे, बोरनार, कनाशी, बोदर्डे, निंभोरा. रविवार (ता. २७) भोरटेक- उमरखेड, तांदुळवाडी, मळगाव. सोमवार (ता. २८) : प्रिंहाट, शिंदी, पेंडगाव, खेडगाव, बात्सर येथे दौरा असणार आहे. २ जुलै : आडळसे, जुवार्डी, गुढे, पथराड, कोळगाव. ३ जुलै : पिचर्डे, शिवणी, पाढरंद, वडजी, वाक. ४ जुलै : वडगाव बुद्रुक, बाळद, कोठली, पासर्डी. ५ जुलै : वडगाव नालबंदी, पळासखेडे, महिदंळे, वलवाडी येथे दौरा नियोजित आहे. हा दौरा सकाळी आठ ते दुपारी १२ पर्यंत असेल, अशी माहिती आमदार किशोर पाटील यांचे स्वीय सहाय्यक राजेश पाटील यांनी दिली.
कोरोनामुळे अनेक अडचणींना सामोरे जावे लागले. त्यामुळे लोकांच्या समस्या गावातच सुटाव्यात, या उद्देशाने ‘आमदार आपल्या दारी’ हा उपक्रम हाती घेतला आहे. लोकाच्या समस्या गावातच सोडविण्याचा माझा प्रयत्न असणार आहे.
- किशोर पाटील, आमदार, पाचोरा-भडगाव
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.