बैलगाडी, मोटरसायकल ढकलत जिल्हाधिकारी कार्यालयावर

बैलगाडी, मोटरसायकल ढकलत जिल्हाधिकारी कार्यालयावर
jalgaon collector office
jalgaon collector officesakal
Updated on

जळगाव : पेट्रोल, डिझेल, गॅसच्या किंमती कमी करा, खाद्यतेल व जीवनावश्यक खाद्य पदार्थांचे भाव कमी करा, वीज बिल माफ करा, महागाई (Petrol diesel price) कमी करता येत नसेल तर खुर्ची खाली करा’ आदी मागण्यांसाठी मंगळवारी (ता. १५) बहुजन मुक्ती पक्षातर्फे दुचाकी, चारचाकी, बैलगाड्या ढकलत जिल्हाधिकारी कार्यालयावर (Jalgaon collector office) आणून आंदोलन झाले. सर्वच बाबतीत महागाई वाढल्याने ती कमी करण्याबाबत आक्रोश मोर्चा काढण्यात आला. (petrol-diesel-price-strike-bahujan-mukti-jalgaon-collector-office)

jalgaon collector office
अर्धा जून संपूनही पेरणीयुक्त पाऊस नाही; शेतकरी म्हणताहेत गेला पाऊस कुणीकडे

केंद्र सरकारने पेट्रोल, डिझेल, घरगुती गॅसच्या किमती प्रचंड वाढविल्या. राज्य सरकारने वाढवलेल्या वीजबील व खाद्यतेलाच्या दरवाढी विरोधात बहुजन मुक्‍ती पार्टी युवा आघाडी व महिला आघाडीतर्फे स्वातंत्र्य चौक ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत बैलगाडी, मोटरसायकल, रिक्षा व चारचाकी वाहनांना ठकलून “धक्का मारो आंदोलन” करण्यात आले.

प्रास्ताविक इरफान शेख, सूत्रसंचालन राजेंद्र खरे यांनी केले. सुभाष सुरवाडे यांनी आभार मानले. आंदोलनाचे नेतृत्व बहुजन मुक्त पार्टीचे महाराष्ट्र राज्य सदस्य हारुन मन्सुरी, जिल्हाध्यक्ष अमजद रंगरेज, अलीम शेख, जिल्हा महासचिव विजय सुरवाडे, सुनिता पवार, बहुजन मुक्‍ती पार्टी महिला आघाडीच्या संध्या कोच्रे यांनी केले. विनोद अडकमोल (युवा अध्यक्ष, बहुजन मुक्‍ती पार्टी), रवींद्र वाडेख, प्रमोद सौंदाणे- पाटील, सुनिल शिंदे- पाटील, अजय इंगळे, ईरफान शेख, रियाज पटेल, खुशाल सोनवणे, रहीम तांबोळी, सुभाष सुरवाडे, विजय साळवे, संगिता देहाडे, अनिता पंढारकर, राजश्री अहिरे आदींनी सहकार्य केले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()