रावेर (जळगाव) : तालुक्यातील मागील आठवड्यात काही भागात मुसळधार व मध्यम स्वरूपाचा पाऊस पडल्यामुळे २८ हजार ५९८ हेक्टर क्षेत्रात ६८ टक्के खरिपाच्या पेरण्या झाल्या आहेत. आतापर्यंत सातपुडा पर्वत भाग व तालुक्यातील काही भागातील खरिपाच्या पेरण्या खोळंबल्या आहेत. खरिपाच्या पेरण्यानंतर पावसाने ओढ दिली आहे. (jalgaon-news-raver-aria-farmer-cotton-plantation)
खरीप हंगामाच्या पेरणीसाठी कृषी विभागाने उद्दिष्ट दिले आहेत. यात पेरणीलायक ५२ हजार ५०४ हेक्टर क्षेत्रात पेरणीचे उद्दिष्ट दिलेले आहे. यात बागायती कापूस १५,७९९ (१५,६००), जिरायत कापूस - ४९७ (३,६१०), ज्वारी - १,६३१ (५,३१०), मका - ९१५ ( २,३१०), तूर - ६२१(१, ४१५), मूग - १४६ (३५०), उडीद - २३० (८३०), सोयाबीन - ३१ (४५१) ,भुईमूग - (६०), हळद १०८१, केळी - ७,६४७ (२१,१३९) इतर ३ हजार ३५९ असे एकूण ५२ हजार ५०४ हेक्टर क्षेत्राचे खरीप पिकासाठी उद्दिष्ट देण्यात आले आहे. आज अखेर २८ हजार ५९८ हेक्टर क्षेत्रात ६८ टक्के पेरणी झाली आहे.
रावेर मंडळात सर्वाधिक पाऊस
तालुक्यात २४ जूनला कमी अधिक प्रमाणात पाऊस पडला. यामुळे शेतकऱ्यांनी ८६ टक्के खरिपाच्या पेरण्या केल्या. या नंतरच्या कालावधीत काही भागात असमाधानकारक पाऊस पडल्यामुळे उर्वरित खरिपाच्या पेरण्या रखडल्या आहेत. रावेर ११०, खानापूर ७८, सावदा ९२, खिरोदा प्रगणे यावल ८८, निंभोरा बुद्रुक ७०, ऐनपूर ७६, खिर्डी ८१ असा एकूण तालुक्यात सरासरी ८५ मिलिमीटर पाऊस तालुक्यात आतापर्यंत पडला आहे.
बागायती कपाशीचे क्षेत्र वाढले
दरम्यान, २५ मे ते १ जून या कालावधीत गारपीट, वादळी पावसाच्या तडाख्यामुळे सुमारे दोन हजार हेक्टर क्षेत्रातील केळी पीक जमीनदोस्त होऊन केळी उत्पादक शेतकऱ्यांचे सुमारे ७५ कोटींचे केळी पिकांचे नुकसान झाले होते. यामुळे शेतकऱ्यांनी केळी बाग साफ करून काही शेतकऱ्यांनी केळी पिलबाग ठेवला आहे तर कृषी विभागाने दिलेल्या उद्दिष्टांपेक्षा २०० हेक्टर क्षेत्रात सुमारे १५ हजार ७९९ हेक्टर क्षेत्रात बागायती कपाशीची पेरणी केली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.