रावेर (जळगाव) : तालुक्यात आठवड्यात तीन वेळा वादळी पाऊस (Heavy rain in raver taluka) झाला. यात एकूण ५९८ घरांचे नुकसान झाले असून, सुमारे ३८ कोटी रुपयांच्या केळीचे नुकसान झाले असल्याचा शासनाचा प्राथमिक अंदाज आहे. वस्तुनिष्ठ पंचनामे करण्याचे काम सुरू असून, प्रत्यक्ष नुकसानीचा आकडा आणखी वाढण्याची भीती व्यक्त होत आहे. (raver-taluka-storm-and-heavy-rain-banana-farm-loss-farmer)
तालुक्यातील २३ गावातील ९४९ शेतकऱ्यांचे गुरुवारी (ता. २७) ७५७ हेक्टर क्षेत्रातील सुमारे ३० कोटी ३० लाख रुपयांच्या केळीचे नुकसान झाले होते तर शनिवारी (ता. २९) झालेल्या चक्रीवादळात १४ गावातील १७४ शेतकऱ्यांचे १८९ हेक्टर क्षेत्रातील ७ कोटी ५६ लाख रुपयांचे नुकसान झाले असल्याचा प्राथमिक अंदाज महसूल आणि कृषी विभागाने (jalgaon agriculture department) व्यक्त केला आहे. दरम्यान, बाजारभावाप्रमाणे झालेले नुकसान १०० कोटी रुपयांपेक्षा जास्त असल्याचे सांगितले जात आहे. गुरुवारी (ता. २७) ५१२ घरांचे आणि शनिवारी (ता. २९) ८६ घरांचे असे एकूण ५९८ घरांचे मोठे नुकसान वादळी पावसाने झाले आहे. या सर्वांना तातडीने मदत देण्याचे आश्वासन पालकमंत्री गुलाबराव पाटील (Minister gulabrao patil) यांनी दिले आहे. त्याकडे आता सर्व शेतकरी आणि नुकसानग्रस्त यांचे लक्ष लागून आहे.
पाल परिसरात पाहणी
पाल (ता. रावेर) : पालसह परिसरात शनिवारी (ता. २९) दुपारी तीनच्या सुमारास झालेल्या वादळी पावसाने केळीचे मोठे नुकसान झाले. तसेच अनेक घरांचेही नुकसान झाले. दरम्यान, रविवारी (ता. ३०) तहसीलदार उषाराणी देवगुणे यांनी नुकसानग्रस्त भागात पाहणी केली व नुकसानीचा पंचनामा लवकरात लवकर करून भरपाईसाठी पाठपुरावा केला जाईल, असे आश्वासन दिले. या वेळी आमदार शिरीष चौधरी यांचे चिरंजीव धनंजय चौधरी, सातपुडा विकास मंगलचे सचिव अजित पाटील, कृषी विज्ञान केंद्राचे संचालक महेश महाजन, धीरज नेहते आदी उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.