अन्नदानाच्या नावाखाली गव्हाचा गोरखधंदा; धान्य गोळा करणाऱ्या टोळ्या

अन्नदानाच्या नावाखाली गव्हाचा गोरखधंदा; धान्य गोळा करणाऱ्या टोळ्या
shiv bhojan thali
shiv bhojan thalishiv bhojan thali
Updated on

जळगाव : सध्या लॉकडाउन (Corona lockdown) शिथिल झाले असले तरी गरीब, भुकेल्यांसाठी मानवतेच्या दृष्टिकोनातून अजूनही अनेक सामाजिक संस्थांकडून अन्नदान करून कोरोना संकटावर मात केली जात आहे. मात्र, याच विपरीत परिस्थितीचा गैरफायदा घेत शहरात काही टोळ्यांकडून अन्नदानाच्या नावाखाली गहू किंवा धान्य गोळा करून बाजारात विक्री करण्याचा गोरखधंदा केला जात आहे. असाच प्रकार मुक्ताईनगरातील नागरिकांनी उघडकीस आणला असून, भंडाफोड होताच गोळा केलेले दोन पोती गहू घेऊन भामटे पसार झाले. (shiv-bhojan-center-name-Wheat-business-under-the-name-of-food-donation)

लॉकडाउनच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने शिवभोजन केंद्र (Shiv bhojan thali) सुरू केले आहेत. सध्या केंद्रांवर गोरगरीब, भुकेल्यांना मोफत अन्नदान केले जात आहे. यासाठी प्रत्येक केंद्राला शासनाकडून थाळीप्रमाणे निधी दिला जातो. मात्र, अशा अन्नदान करणाऱ्या शिवभोजन केंद्रांच्या नावाखाली गहू गोळा करणाऱ्या भामट्यांच्या टोळ्या सक्रिय झाल्या आहेत. शहरातील मुक्ताईनगरात अज्ञात तीन-चार तरुणांनी सामाजिक कार्यकर्ते असल्याची बतावणी करून तेथील नागरिकांना यथाशक्ती गहू देण्याचे आवाहन केले. बहुतेकांनी गरिबांसाठी खारीचा वाटा म्हणून आपापल्या परीने घरातील गहू दिला. काही वेळातच दोन पोती गहू जमा झाला. मात्र, तेथील जागरूक नागरिकांनी त्या तरुणांना कुठून आलात? कुठे अन्नदान करणार आहात? याबाबत विचारले असता बसस्थानकाजवळील अन्नदान केंद्रासाठी गहू गोळा करीत असल्याचे सांगून फंडाफोड होत असल्याचे दिसताच तेथून दोन पोती गहू घेऊन काढता पाय घेतला.

shiv bhojan thali
महाराष्ट्राच्या आरोग्यासाठी चार हजार किलोमीटरची पदयात्रा

बाजारात होतेय विक्री

दरम्यान, अशा प्रकारे गहू गोळा करून बाजारात विक्री करीत असल्याची माहिती प्राप्त झाली आहे. याबाबत चौकशी करून अशा प्रकारांना आळा घालण्याची गरज आहे. नागरिकांनीही अनोळखी व्यक्तीला पूर्ण माहिती विचारल्याखेरीज प्रतिसाद देणे अनेकदा धोक्याचे ठरू शकते. त्यासाठी फसवणूक टाळण्यासाठी नागरिकांनी सावधानता बाळगणे तितकेच महत्त्वाचे आहे.

राज्य शासनाकडून प्रत्येक शिवभोजन केंद्राला निधी दिला जातो. त्यामुळे केंद्राकडून अशी कुठलीही माणसे गहू गोळा करण्यासाठी पाठविलेली नाहीत. शिवभोजन केंद्रांच्या नावाखाली जर अशाप्रकारे धान्य गोळा करण्याचे प्रकार होत असतील ते निंदनीय आहे. नागरिकांनी पूर्ण माहितीशिवाय प्रतिसाद देऊ नये.

- एकनाथ माळी, संचालक, शिवभोजन थाळी, भजे गल्ली, जळगाव

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.