व्हाट्सएपने जोडले अठराशे विवाह; सोशल मिडीया ठरतेय मध्यस्‍थी

marriage
marriage
Updated on

जळगाव : ‘जन्मबंध’ व्हॉट्सएपच्या ग्रुपच्या माध्यमातून छोट्याशा रोपट्याचे रुपांतर वटवृक्षात झाले असून या "जन्मबंध व्हाट्सएप" ग्रुपच्या मार्फत 1 हजार 810 लग्न जुळवून आणली आहेत. सन २०१५ पासून "जन्मबंध " व्हाट्सएपच्या माध्यमातून सुवर्णकार (सर्व शाखीय) समाजासाठी हा नि:शुल्क अभिनव उपक्रम राबवला आहे. 
जन्मबंध व्हाट्सएपच्या ग्रुप हा एकमेव नि:शुल्क सेवा देणारी संस्था ठरु लागली आहे. नो पैसा, नो भ्रष्टाचार या संकल्पनेतून महाराष्ट्रसह गुजरात, राजस्थान, गोवा, मध्यप्रदेशसह विदेशात अमेरिका (समाजबांधव जेथे असतील तेथे) येथीलही सुवर्णकार समाजातील मंडळींचा सहभाग असतो. त्यामुळे डिजिटल इंडियाच्या माध्यमातून वधूवरांच्या बायोडाटाविषयाची माहिती सहज उपलब्ध होऊ शकते.

कोरोना काळात अधिक उपयुक्‍त
उपक्रमातून 3 हजार 600 वधु-वरांच्या जन्मगाठी जुळून त्यांचे कुटुंब जवळ आले असून वधु-वरांच्या पसंतीसाठी येणारा करोडो रुपयांचा खर्च वाचला आहे. कोरोना कालावधीत लग्न जुळवण्यासाठी यजमान्यांना एकमेकांची भेट घेणे शक्य नसल्याने जन्मबंध व्हाट्सएपच्या माध्यमातून संपर्क साधत पसंतीचे कार्यक्रम भावी वधु- वरांनी उरकून घेतले. "जन्मबंध" व्हाट्सएप ग्रुपची स्थापना २०१५ पासून झाल्यापासून या ग्रुपद्वारे वधूवरांची नोंदणी विनामूल्य करण्यात येते. 

आणि ते शक्‍य झाले
समाजाकडून ही या निःस्वार्थी सेवेला चांगला प्रतिसाद आहे. हा उपक्रम सुरु करण्यात जन्मबंध संस्थापक अध्यक्ष प्रभाकर मोरे (माहिम, मुंबई) तसेच समाजातील जाणकार मंडळीनी ही संकल्पना अंमलात आणली. व्हाट्सएपच्या माध्यमातून १८००लग्न जळू शकतात हि संकल्पनेवर कुणाचा विश्वास बसणार नाही पण हे शक्य झाले जन्मबंध व्हाट्सएपच्या ग्रुपमुळे!. लग्नकार्य जुळवून यावीत यासाठी "जन्मबंध" व्हाट्सएप ग्रुपने यासाठी वेगळी व्यवस्था केली आहे. आलेल्या (वधूवर) व्यक्तींची फोटो, ग्रुप वाढविणे, बायोडाटा, एडिटिंग, आँनलाईन वधूवर परिचय वेबिनार आयोजन करणे इ. तयार करून वेगवेगळ्या जन्मबंध व्हाट्सएपच्या ग्रूपवर टाकून सेवा दिली जात आहे. 

२१० ग्रुप बनले
ग्रुपचे कार्यकारी अँडमिन तसेच व्यवस्थापन यांच्या माध्यमातून जन्मबंधचे महाराष्ट्र, गुजरात इ. राज्यामध्ये आजपावतो १५ वधूवर परिचय मेळावे यशस्वी झाले असून ३ मेळावे घरी बसून डिजिटल इंडियाच्या आँनलाईन वर्चुअल वेबिनारच्या माध्यमातून झाले आहे. दिवसेंदिवस चांगला प्रतिसाद मिळत आहे. जन्मबंध व्हाट्सएपच्या ग्रुपचे २१० ग्रुप बनविले आहे,१५०००बायोडाटा तयार करून,२७,०००सदस्यांनी नोंद असून जन्मबंध व्हाट्सएपच्या माध्यमातून निशुल्क सेवा देत आहे.

वाद मिटविण्यासाठी तंटा निवारण समिती
जर वधू- वरांमध्ये लग्नानंतर समज गैरसमजुतीतून भांडण अथवा वादविवाद झाले; तर वाद न्यायालयात न जाता त्यांच्यामध्ये (वधूवर परिवारांमध्ये) समेट घडवून आणण्यासाठी जन्मबंध तंटा निवारण समिती कार्य करीत आहे. त्यात त्यांना चांगल्या प्रकारे यशही आले आहे. जन्मबंध व्हाट्सएपच्या माध्यमातून व्यक्ती सामाजिक बांधिलकी जोपासून निशुल्क सेवा देत आहे. यामुळे वधूवरांची माहिती घरपोच व्हाट्सएपच्या ग्रुपच्या माध्यमातून मिळत असल्याने करोडोंचा खर्च वाचला आहे. सुवर्णकार समाजाकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे.

अनेक मुला-मुलींना आपल्या आवडीनिवडीची स्थळे शोधताना अडचणी येतात. यासाठी आर्थिक खर्चही करावा लागतो. या ग्रुपच्य माध्यमातून लग्नसंस्थेतील काही उणिवा दूर करण्याचा प्रयत्न केला आहे. काही नवविवाहितांमध्ये  छोट्याशा कारणांमुळे भांडणे होतात. कोर्ट कचेऱ्या करणे आर्थिकदृष्ट्या परवडत नाही. या ग्रुपच्या माध्यमातून तंटे मिटविण्याचीही कामे केली जातात.
- प्रभाकर मोरे, ग्रुप संस्थापक

संपादन ः राजेश सोनवणे
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.