जळगाव : कडाक्याचा उन्हाळा सुरू झाल्यानंतर जीवाची लाहीलाही होते. त्यातच जळगाव म्हणजे चाळीशी पार गेलेले तापमान आणि यामुळे जाणवणाऱ्या तिव्र उष्णतेच्या झळांना जीव हैराण होतो. यातून दिलासा मिळण्यासाठी गारवा हवा असतो. याकरीता कुलर, एसीचा मोठ्या प्रमाणात वापर होत असतो. पण जसे एसी आणि कुलर फिरते त्याच पटीने मीटरचे युनिट देखील फिरतात; याची चिंता असते.
कुलर लावताय मग बिलाची चिंता नाही
उन्हाळ्यात सर्व जणांना आस लागते ती गारव्याची. प्रत्येक जण कुलर, एसीच्या माध्यमातून उन्हाळ्यात दिलासा मिळविण्यासाठी प्रयत्न करतात. मात्र उन्हाळ्याचे अडीच- तीन महिने म्हटले तर वीज बिलाचा आकडा फुगतो. अगदी कुलर जरी लावले तरी महिन्याला दीड ते दोन हजाराच्या जवळ बील येते. सर्वसामान्यांना हे परवडणारे नसते. नेमकी हीच समस्या दूर करण्यात विपुल आणि मनोज फालक या दोन्ही भावांनी तयार केलेले सोलर कुलर साकारले आहे.
वीजच नाही तर बिलही येणार शुन्य
सोलर कुलरचे वैशिष्ट्य म्हणजे हे कुलर दिवसा सोलर एनर्जीवर चालते. याचवेळी बॅटरी चार्ज होते आणि रात्री किमान सहा तासांच्या बॅटरी बॅकअपवर कुलर चालविता येणे शक्य आहे. अर्थात साध्या कुलरमुळे महिन्याला येणारे हजार ते दीड हजार रूपयांचे बिल शुन्य आहे. शिवाय, या कुलरसाठी असलेल्या वीजेचा वापर केला तर यामुळे केवळ शंभर ते दीडशे रूपयांचे बिल येणार आहे. विशेष म्हणजे हे कुलर पूर्णपणे शॉक प्रूफ आहे.
उन्हाळा संपल्यानंतरही वापर शक्य
उन्हाळा संपल्यानंतर तीन महिने वापरलेले कुलर पुन्हा एकदा कोपऱ्यात ठेवले जाते. परंतु, सोलर कुलरसाठी वापरण्यात आलेले सोलर पॅनल हे वर्षभर वापरता येणे शक्य आहे. कारण उन्हाळा संपल्यानंतर पावसाळ्यात वीज पुरवठा खंडीत होण्याचे प्रमाण वाढते. यावेळी सोलर पॅनलचा वापर करून एलईडी लाईट, फॅन वापरता येतात. तर मोबाईल चार्जींग करता येणार आहे.
इंजिनिअर बंधूची कल्पना
विपुल फालक यांचे इलेक्ट्रिकचे दुकान आहे. तर मनोज फालक यांचे इलेक्ट्रिक इंजिनिअरींगचे शिक्षण झाले आहे. त्यांनी महाविद्यालयात असताना असाच एक प्रोजेक्ट तयार केला होता. त्या अनुषंगाने तो प्रोजेक्ट प्रत्यक्षात साकारण्यासाठी कुलरसाठी त्याचा प्रयोग केला. सोलरचे असे कुलर २ ते ४ फुटच्या साईजमध्ये तयार करून देत आहेत.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.