थरथरणाऱ्या हातांनी आईला रक्‍तबंबाळ अवस्‍थेत नेले; मालमत्‍तेचा वाद, दिराकडून हत्‍याकांड

थरथरणाऱ्या हातांनी आईला रक्‍तबंबाळ अवस्‍थेत नेले; मालमत्‍तेच्या वादातून दिराकडून हत्‍याकांड
crime news
crime newscrime news
Updated on

जळगाव : अपघाती निधन झालेल्या भावाची मालमत्ता हडपण्यासाठी दीपक सोनार याने त्यांची वहिनी योगिता सोनार (वय ३९, रा. मयूर कॉलनी, पिंप्राळा) यांच्या डोक्यात कुऱ्हाडीने वार (Murder case) करून हत्या केली. मध्यरात्री रामानंदनगर पोलिसांत गुन्हा दाखल (Jalgaon police) होऊन दीपकला अटक झाली. मात्र, मृत पतीच्या मालमत्तेवर पिंप्राळा तलाठ्याने परस्पर वारसांची नावे लावल्याने त्यातूनच खून (Crime news) झाला असून, तलाठ्याच्या अटकेसाठी मृताच्या नातेवाइकांनी गोंधळ घालत मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिला. (crime news ax over property dispute murder case)

crime news
हॉटस्पॉट ठरलेले जळगाव शहर नियंत्रणात.. केवळ सोळा नवे बाधित

पिंप्राळा तलाठ्याला हाताशी धरून मृत भावाच्या मालमत्तेवर अतिरिक्त वारसांची नावे वाढवून घेतल्याने दीपक व योगिता यांच्यात शाब्दिक चकमक उडून दीपकने घरात आणून ठेवलेली कुऱ्हाड योगिताच्या डोक्यात घालून तिची हत्या केल्याचे प्रत्यक्षदर्शी आर्यन सोनार याने माहिती देताना अप्पर अधीक्षक चंद्रकांत गवळी यांना सांगितले. गुन्हा दाखल होऊन पोलिसांनी संशयित दीपकला अटक करून शनिवारी (ता. २२) न्यायालयात हजर केले. न्यायालयाने संशयितास दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली. पिंप्राळा तलाठ्यासह इतरांना आरोपी करण्यासाठी मृताच्या नातेवाइकांनी जिल्‍हा रुग्णालयात गोंधळ घालत मृतदेह घेण्यास नकार दिला. पोलिस अधिकाऱ्यांच्या मध्यस्थीनंतर नातेवाइकांनी मृत योगिताचा मृतदेह ताब्यात घेत अंत्यसंस्कार केले.

..अन्‌ दीपकने कुऱ्हाड डोक्यात टाकली

मयूर कॉलनीत सासू प्रमिला, दीर दीपक आणि मुलगा आर्यन यांच्यासह योगिता वास्तव्यास होत्या. सहा महिन्यांपूर्वी त्यांचे पती मुकेश सोनार यांचे यावल येथे अपघाती निधन झाले. मुकेशच्या निधनानंतर १६ दिवसांनी त्यांचे वडील लोटन सोनार यांचेही हृदयविकाराने निधन झाले. मुकेश यांची विधवा पत्नी योगिता व भाऊ दीपक यांच्यात पॉलिसीचे मिळालेले पैसे आणि मालमत्तेवरून कुरबूर सुरू होती. शुक्रवारी रात्री जेवणानंतर दीपकने भावाच्या काही फायली काढल्या. तेवढ्यात त्याच्यात व योगिता यांच्यात वाद झाला. दीपकने पूर्वीपासूनच आणलेली कुऱ्हाड पलंगामागून काढत योगिताच्या डोक्यात हाणली. त्यात त्यांचा जागीच मृत्यू झाला.

crime news
आधी वडिल,नंतर आजोबा आता आईचा मृत्यू,असे संकट पाहणाऱ्या जलतरणपटूची करूण कहाणी!

आर्यन प्रत्यक्षदर्शी

आईवर काका दीपकने हल्ला करताच आवाजाने मुलगा आर्यन याने धाव घेत काकाच्या हातून कुऱ्हाड हिसकवली. लगेच आईच्या माहेरी मावशी प्रियंकाला घटना कळवली. शेजारी सुनील वडनेरे, मुलगा सोनू यांनी रक्तबंबाळ अवस्थेत योगिता यांना रुग्णालयात नेले. मालमत्तेच्या वादातून काका दीपकने आईची हत्या केल्याची फिर्याद आर्यन याने दिली. रामानंदनगर पोलिसांनी दीपकला अटक करून गुन्ह्यातील कुऱ्हाड जप्त केली. सहाय्यक फौजदार प्रवीण जगदाळे यांनी संशयिताला न्यायालयात हजर केले.

मृतदेह ताब्यात घेण्यास नकार

जिल्हा रुग्णालयात मृत योगिता यांच्या बहिणीसह माहेरच्या नातेवाइकांनी गर्दी केली होती. मृताचे दहा तोळे सोने लांबवले आहेत. दीपक सोनार यांच्यासह योगिताची सासू, नणंद, नंदोई व कागदपत्रात फेरफार करणारा पिंप्राळा तलाठी यांना खुनाच्या गुन्ह्यात अटक करावी, अन्यथा मृतदेह ताब्यात न घेण्याचा पावित्रा नातेवाइकांनी घेतला होता. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी नातेवाइकांची समजूत घातल्यावर त्यांनी मृतदेह ताब्यात घेतला.

मृताच्या मिळकतीवर कायद्यानुसार आई, पत्नी व मुलं असा अधिकार असतोच. त्याच प्रमाणे मुकेश सोनार यांच्या मिळकतीवर (६ एप्रिल) एक महिन्यापूर्वीच प्रमिला(आई), योगिता (पत्नी), आर्यन (मुलगा) यांचे नाव वारसाहक्कात लागले. त्यात कुठलेही गैरकायद्याचा अवलंब झाला नाही. सर्व नोंदींबाबत तहसीलदारांना नुकतीच माहिती दिली आहे.

- संदीप ढोबाळ, तलाठी, पिंप्राळा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.