सोशल मीडियाच्या जमान्यात 'माणुसकी'आली कामी;अपघातग्रस्त युवकाचं वाचलं प्राण!

सर्वांच्या कार्यतत्परतेने वेळीच उपचार झाल्याने त्या युवकाचे प्राण वाचले.
सोशल मीडियाच्या जमान्यात 'माणुसकी'आली कामी;अपघातग्रस्त युवकाचं वाचलं प्राण!
Updated on

अमळनेर: स्वार्थी युगात हरवलेली माणुसकी अन सोशल मीडियाच्या (Social media) चक्रव्यूहात अडकलेले नेटिझन्स (Netizens) हे सध्याच्या युगाचे दुष्परिणाम आहेत. मात्र काल झालेल्या अपघातात (Accident) या दोन्ही गोष्टीला तिलांजली मिळाली आहे. या अपघातात युवकावर "काळ आला होता..वेळ पण आली होती" मात्र माणुसकी अन सोशल मीडियाने वेळीच एन्ट्री केल्याने "क्रूर वेळ" टळली अन योग्य वेळी उपचार मिळाल्याने त्या युवकाचे प्राण वाचले (save life). (accident injured youth saved life of social media)

सोशल मीडियाच्या जमान्यात 'माणुसकी'आली कामी;अपघातग्रस्त युवकाचं वाचलं प्राण!
वादळी पावसाने हिरावले घराचे छप्पर..आणि वह्या पुस्तकेही !

अंचळगाव (ता भडगाव) येथील मनोज धोंडू पाटील (वय-३२) हा युवक त्याच्या मोटार सायकलने आपल्या आजीला शिंगावे (ता शिरपूर) येथे सोडायला गेला होता. तेथून परत येताना गलवाडे गावाच्या पेट्रोल पंपाजवळ गुरुवारी दुपारी साडे चार च्या सुमारास अपघात झाला. तो युवक रक्ताच्या थारोळ्यात पडला होता. अखेर येथील झामी चौकातील राहुल सोनार त्याठिकाणी थांबला. त्याने गोपाल कोळी, गोकुळ कोळी, बबलू मोरे, दौलत मोरे, बाळू पाटील (सर्व रा कोळपिंप्री) यांनी त्या जखमी युवकाला रिक्षात टाकले. सोनू ठाकुर या रिक्षावाल्याला त्या जखमी तरुणाला ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. डोक्याला मागील बाजूस लागल्यामुळे डोक्यातून व त्याच्या दोन्ही कानातून रक्त येत होते. वैद्यकीय अधिकारी डॉ.जी.एम. पाटील यांनी तातडीने त्याच्यावर प्राथमिक उपचार केलेत.

सोशल मीडियाच्या जमान्यात 'माणुसकी'आली कामी;अपघातग्रस्त युवकाचं वाचलं प्राण!
पाचोरा-भडगाव बाजार समितीवर प्रशासक मंडळ !

सोशल मीडियावर चक्र फिरली

घटनास्थळी एका युवकांने मदतीचा हात दिल्यावर त्या तरुणाचे फोटो काढून पत्रकारांना टाकले. संजय पाटील, विजय गाढे, नूरखान, रवींद्र मोरे यांनी लगेचच सोशल मीडियावर हे फोटो व्हायरल केले. केवळ अर्धा तासात हा संदेश त्यांचे नातेवाईक मिलिंद पाटील, उमेश काटे, महेंद्र पाटील यांच्यापर्यंत पोहोचले. त्यांनी तात्काळ ग्रामीण रुग्णालय गाठले. त्यांनी ग्रामीण रुग्णालयातुन एका येथील एका खासगी रुग्णालयात नेले. तिथे सिटीस्कॅन झाल्यानंतर डॉ संदीप जोशी यांनी पुढील उपचारार्थ धुळे येथे हलविण्याचा सल्ला दिला. मनोज पाटील वर रात्री धुळे येथील खासगी रुग्णालयात मेंदू ची यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली. ४८ तासानंतर तो शुद्धीवर येईल. सर्वांच्या कार्यतत्परतेने वेळीच उपचार झाल्याने त्या युवकाचे प्राण वाचले. मिळाले. तो तरुण अंचळगाव येथील माजी सरपंच धोंडू साहेबराव पाटील यांचे जेष्ठ सुपुत्र तर कन्हेरे येथील माजी सरपंच लोटन पाटील यांचे जावई आहेत. दरम्यान रस्त्यावर पडलेल्या जखमी ला पाहिल्यानंतर धीरज बोरसे व धीरज पाटील यांनी १०८ ला फोन लावला होता मात्र त्यांनी त्यात कोणताही प्रतिसाद दिला नाही. रुग्णवाहिका यायला उशीर होत असल्याने अखेर रिक्षाने त्या जखमी युवकाला ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. जितेंद्र काटे यांनी रुग्णवाहिका न आल्याने ऑनलाईन तक्रारही दाखल केली होती. शेवटी ग्रामीण रुग्णालयात १०८ च्या रुग्णवाहिका मिळाली अन त्या वाहिकेनेच धुळे येथे नेले.

सोशल मीडियाच्या जमान्यात 'माणुसकी'आली कामी;अपघातग्रस्त युवकाचं वाचलं प्राण!
‘पाणी अडवा पाणी जिरवा’च्या कामांना वेग !

मोबाइल व रोख रक्कम परत

जखमी मनोज पाटील याला अनेकांनी मदत केली मात्र तरीही गर्दीत ही त्याच्या सोबत असलेली रोख रक्कम तसेच मोबाईल सुरक्षित होता. या मोबाईल वरूनच संबंधित युवकाचे नाव निदर्शनास आले. पोलीस हवालदार भास्कर चव्हाण यांनी हा मोबाइल व रोख रक्कम त्या जखमी चे नातेवाईक मिलिंद पाटील व उमेश काटे यांच्याकडे सुपूर्द केला. "आधी उपचार मग चौकशी" असे परिस्थिती चे भान ठेवून श्री चव्हाण यांनी सहकार्य केल्याने खाकीचा आदर वाढला एवढे मात्र निश्चित!

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.