यंदाही शिक्षणाचा श्रीगणेशा आभासी पद्धतीनेच !

विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने ऑनलाईन शिक्षणाला प्राधान्य देण्यात येत आहे.
यंदाही शिक्षणाचा श्रीगणेशा आभासी पद्धतीनेच !
Updated on

वावडे (ता. अमळनेर) : गतवर्षीचे सूत्र कोरोना (corona) संक्रमणाच्या सावटात शिक्षकाविना म्हणजेच आभासी पद्धतीने पार पडले. तिसरी लाट (Corona third wave) येण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. सर्वाधिक धोकादायक ठरणार असल्याचेही बोलले जाते. त्यामुळे प्राथमिक शाळा सुरू होऊन हे जवळपास अशक्य मानले जात आहे. तेव्हा नव्या शैक्षणिक वर्षातही (Academic Year) शिक्षणाचा श्रीगणेशा विद्यार्थ्यांविनाच म्हणजेच ऑनलाइन प्रणालीद्वारे (Online system) होणार असल्याचे चित्र आहे. (beginning of the new year is online education)

यंदाही शिक्षणाचा श्रीगणेशा आभासी पद्धतीनेच !
पहिल्या दिवशी शिकवायचे काय ?..शाळांसमोर प्रश्‍न

शाळा बंद पण शिक्षण सुरू

जूननंतर शासनाकडून लॉकडाउनमध्ये मोकळीक दिली आहे. सुरक्षेच्या कारणावरून यंदाही शाळा उघडण्याची शक्यता फार कमी आहे. घरात बसूनच शिक्षण घ्यावे लागणार आहे. मागील वर्षभरापासून राज्यात कोरोनाचा कहर सुरू आहे. यामुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा विचार करून नर्सरी ते पाचवीपर्यंतच्या शाळाही बंद होत्या. विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने ऑनलाईन शिक्षणाला प्राधान्य देण्यात येत आहे. मात्र या माध्यमाचे शिक्षण आजचा विद्यार्थी पालक शिक्षकांना ही कंटाळवाणे वाटू लागले आहे.

विद्यार्थ्यांच्या आरोग्यावर त्याचा विपरीत परिणाम होत असल्याचे दिसून येते, तरीही पुन्हा आभासी शिक्षणाशिवाय पर्याय नसल्याचे निदर्शनास येते. महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेच्या (विद्या प्रधिकरण) वतीने ऑनलाइन शिक्षणासाठी विविध सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या. यू-ट्यूब, दूरदर्शन, दीक्षा ॲप, स्वाध्याय यासह विविध उपक्रमातून विद्यार्थ्यांसाठी शिक्षण उपलब्ध करुन देण्यात 'शाळा बंद पण शिक्षण सुरू' या उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांना शिक्षण उपलब्ध करून देण्यात आले आहे. बहुसंख्य विद्यार्थ्यांना मोठ्या प्रमाणात याचा लाभ झाला, तर काहींना नेटवर्क, नेट आदींच्या अडचणीचा सामना करावा लागला. विद्यार्थ्यांना नाईलाजास्तव ऑनलाइन शिक्षण घेणे भाग पडले.

यंदाही शिक्षणाचा श्रीगणेशा आभासी पद्धतीनेच !
जळगाव जिल्ह्यात मॉन्सूनचा पाऊस २० जूननंतरच !

काळजी घेणेही आवश्यक
यंदाही गतवर्षीपेक्षा अधिक प्रभावीपणे विद्यार्थ्यांना ऑनलाइन शिक्षण उपलब्ध करून देण्याचे नियोजन सुरू असल्याचे दिसते. येणारे २०२१-२२ हे शैक्षणिक वर्ष २६ जूनपासून सुरू होणार आहे. मात्र या शैक्षणिक वर्षात प्रत्यक्ष प्राथमिक शाळा सुरू होण्याची शक्यता मावळली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी आणि विद्यार्थी शिक्षणाच्या प्रवाहाबाहेर जाऊ नये म्हणून विद्या प्रधिकरणाच्या वतीने विद्यार्थ्यांना आभासी शिक्षण उपलब्ध करून देण्यासाठी हालचाली सुरू झाल्या असल्याचे शिक्षण विभागाकडून दिसून येते. कोरोचे संभाव्य तिसऱ्या लाटेची शाळकरी मुलांना बाधा पोहोचण्याची शक्यता तज्ज्ञांकडून वर्तविण्यात आली आहे. यामुळे मुलांची अधिक काळजी घेण्याची गरज आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.