वाट बघतोय रिक्षावाला..तीही शासनाच्या दीड हजाराची !

धार क्रमांकाशी लिंक असलेल्या खात्यात दिड हजारांची मदत तात्काळ जमा केली जाईल
वाट बघतोय रिक्षावाला..तीही शासनाच्या दीड हजाराची !
Updated on

अमळनेर : "कामावर जायला उशीर झाला... बघतोय रिक्षावाला ग वाट माझी बघतोय रिक्षावाला" या गाण्याने काही वर्षांपूर्वी धमाल उडवून दिली होती, मात्र कोरोना (corona) काळात कडक लॉक डाऊन (Lockdown) असल्यामुळे याच रिक्षावाल्यावर (Auto driver) दोन घास मिळविण्यासाठी वाट बघण्याची वाईट वेळ आली होती. यातून बाहेर काढण्यासाठी शासनाने (government) दीड हजार रुपयांची आर्थिक निधी (Financial funding) द्यायला सुरुवात केल्याने वाट बघणाऱ्या रिक्षावाल्यामध्ये समाधान व्यक्त होत आहे.

(Lockdown government Financial funding Auto driver waiting)

वाट बघतोय रिक्षावाला..तीही शासनाच्या दीड हजाराची !
म्युकरमायकोसिसचे सर्वाधिक रुग्ण जळगाव जिल्ह्यात

कोरोनाच्या संकटकाळात रिक्षाचालकांना दीड हजार रुपयांची मदत देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला होता. या निर्णयाच्या अंमलबजावणीसाठी व मदत योग्य रिक्षाचालक लाभार्थ्यांपर्यंत पोहचविण्यासाठी 'आयसीआयसीआय’ बँकेतर्फे स्वतंत्र संगणकप्रणाली विकसित करण्यात आली आहे. या प्रणालीवर परवानाधारक रिक्षाचालकांना आज पासून ऑनलाईन अर्ज करता येणार आहेत. कोणतीही कागदपत्रे सादर न करता संगणक प्रणालीवर वाहन क्रमांक, अनुज्ञप्ती क्रमांक व आधार क्रमांकांची माहिती भरल्यानंतर, पडताळणी होऊन रिक्षा चालकांच्या खात्यात आधार क्रमांकाशी लिंक असलेल्या खात्यात दिड हजारांची मदत तात्काळ जमा केली जाईल. यासंदर्भातील निर्णय उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली अलिकडेच मंत्रालयात झालेल्या बैठकीत घेण्यात आला. त्याची अंमलबजावणी सुरु झाली आहे.

वाट बघतोय रिक्षावाला..तीही शासनाच्या दीड हजाराची !
जळगाव जिल्ह्यात ऑक्सिजन, रेमडेसिव्हिरची मागणी निम्म्यावर

राज्यातील परवानाधारक रिक्षाचालकांना कोरोनाकाळात दीड हजार रुपयांचे अर्थसहाय्य देण्याची प्रक्रिया आजपासून सुरु झाली आहे. लॉकडाऊन च्या काळात रिक्षा चालकांना या मदतीमुळे हातभार लागणार आहे. रिक्षा धारकांनी या निर्णयाचे स्वागत करून शासनाचे आभार मानले आहेत.

कृषिभूषण साहेबराव पाटील, माजी आमदार, अमळनेर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.