ऑक्सिजन पातळी फक्त ५८..वृद्धेने केली कोरोनावर मात !

सिटी स्कॅन करण्यात आला त्यात स्कोर हा १८ आला..
ऑक्सिजन पातळी फक्त ५८..वृद्धेने केली कोरोनावर मात !
Updated on

अमळनेर ः जीवनाची दोरी जर बळकट असली तर कोरोना (corona) सारखी प्रतिकूल परिस्थिती ही त्यांच्या आडवी येऊ शकत नाही याचा अनुभव येथील जुना पारधी वाड्यातील एका ७० वर्षीय महिलेने (old lady) बाबत घडला आहे. ऑक्सिजन (Oxigen) पातळी ५८ तसेच सिटीस्कॅनचा स्कोअर १८ असूनही ही महिला अवघ्या नऊ दिवसातच कोरोना वर मात केली. सुशिलाबाई पंडित पवार असे त्या वृद्धेचे नाव आहे. (old lady nine days corona fight life saved)

ऑक्सिजन पातळी फक्त ५८..वृद्धेने केली कोरोनावर मात !
ग्रामस्‍थांच्या श्रमदानातून बोडका झालेल्या डोंगरावर फुलली हिरवळ !

येथील पालिकेच्या माजी आरोग्य सभापती तथा नगरसेविका राधाबाई संजय यांच्या सासुबाई सुशिलाबाई पंडीत पवार (वय ७०) यांना २६ मे रोजी श्वास घ्यायला त्रास होऊ लागला. त्यानंतर सुशिलाबाई यांचा मुलगा संजय पवार- मच्छीवाले व बालीक पवार यांनी येथील एका खासगी हाँस्पिटल मधे दाखल केले. तेथे डॉ. किरण बडगुजर यांनी तपासणी केली असता आँक्सिजन पातळी ५८ होती. त्यानंतर सिटी स्कॅन करण्यात आला त्यात स्कोर हि १८ आल्याने पवार कुटूंबाची चिंता वाढली होती, परंतु डॉ.किरण बडगुजर यांनी पवार कुटूंबाला धिर देत आँक्सिजन लावून औषधोपचारासह शर्तीचे प्रयत्न केले.

ऑक्सिजन पातळी फक्त ५८..वृद्धेने केली कोरोनावर मात !
सर्वोत्कृष्ट जिल्हाधिकारी म्हणून अभिजीत राऊत; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सन्मान

नऊ दिवस दिला लढा..

त्या वृद्धेने ९ दिवस कोरोणाशी लढा देत कोरोणाला हरवले. सुशीलाबाई यांची आँक्सिजन पातळी ९८ पर्यन्त येऊन त्या बऱ्या झाल्याने त्यांना सायंकाळी डॉ.किरण बडगुजर सह श्री दत्त हाँस्पिटल चा पुर्ण स्टाफ यांनी आजी सुशिलाबाई पवार यांना सुखद आरोग्याच्या शुभेच्छा देत टाळ्या वाजवत कोरोणाला हरवल्याच्या शुभेच्छा दिल्या. या वेळी पवार कुटूंबा सोबत लोक संघर्ष मोर्चा तथा आदिवासी पारधी विकास परिषदेचे पन्नालाल मावळे यांनी सत्कार केला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()