अमळनेर : मागील महिन्यात तोक्ते चक्रीवादळात (Storm) नैसर्गिक आपत्तीमुळे जीव (Death) गमावलेल्या आंचलवाडी (ता. अमळनेर) येथील दोन्ही सख्ख्या बहिणी (Sister) आणि पळासदडे (ता. अमळनेर) येथील पुरुष यांच्या वारसांना शासनाकडून (government) प्रत्येकी चार लाखांची मदत प्राप्त झाली. आमदार अनिल पाटील (MLA Anil Patil) यांच्या हस्ते संबंधित वारसांना रकमेचे धनादेश तहसील कार्यालयात देण्यात आले. या वेळी तहसीलदार मिलिंदकुमार वाघ, बल्लू बारेला व भादूगिर गोसावी हे उपस्थित होते. (storm death heirs received help from the government)
मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून प्रत्येकी एक लाखांची मदत मिळू शकणार असल्याचे आमदारांनी सांगत त्यासाठी पाठपुरावा सुरू असल्याचेही त्यांनी सांगितले. दरम्यान, मागील महिन्यात अंचलवाडी येथे वादळामुळे गावाबाहेरील खळ्यात चिंचेचे झाड कोसळून झोपडी दाबली जाऊन त्यात पावरा समाजाच्या ज्योती बारेला (वय १६) आणि रोशनी बारेला (वय १०) या सख्ख्या बहिणींचा दबल्याने मृत्यू झाला होता. त्याच दिवशी पळासदडे येथे दुपारी वादळासह पावसामुळे दिलीप भादूगीर गोसावी (वय ५७) भिंत कोसळून मृत्यू झाला होता. या दोन्ही घटनांचा तहसील कार्यालयामार्फत पंचनामा होऊन शासकीय मदतीसाठी शासन दरबारी प्रस्ताव सादर केला होता. हा प्रस्ताव मंजुरीसाठी आमदार अनिल पाटील व प्रशासनाने देखील योग्य पाठपुरावा केल्याने दोन्ही कुटुंबाना लवकर ही मदत मिळाली असून, दोन्ही कुटुंबाना मोठा आधार मिळाला आहे.
इतर लाभार्थ्यांनाही धनादेश
या वेळी राष्ट्रीय कुटुंब अर्थसहाय्य योजनेतील लाभार्थ्यांना देखील प्रत्येकी वीस हजार रकमेचे धनादेश आमदार अनिल पाटील यांच्या हस्ते देण्यात आले. या वारसांमध्ये रूपाली प्रदीप ठाकूर (अमळनेर), हिरा वसंत भिल (दापोरी बुद्रुक), वंदना जगदीश पाटील (देवगाव), अर्चना प्रवीण पाटील (दहिवद), आशा राजू पारधी (अमळनेर), शेवका शांताराम भिल (दापोरी बुद्रुक), छाया भाऊसाहेब पाटील (दहिवद), माया ईश्वर पाटील (अमळनेर) आदींना धनादेश देण्यात आले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.