अमळनेर तालुक्यात ‘महसूल’चा धडाका..पून्हा वाळू ट्रॅक्टर जप्त !

तापी, बोरी, पांझरा नदीत अनधिकृत वाळू वाहतूक करणाऱ्यावर कारवाया झाल्या
अमळनेर तालुक्यात ‘महसूल’चा धडाका..पून्हा वाळू ट्रॅक्टर जप्त !
Updated on



कळमसरे (ता. अमळनेर) : अमळनेर तालुक्यात तापी, बोरी, पांझरा या तीनही नदीपात्रांत बेसुमार वाळू (sand) उपसा करून अवैध वाहतूक सुरू असून, गेल्या आठ दिवसांत पोलिस प्रशासन आणि महसूल विभागाने (Revenue Department) कारवाया (Action) केल्याने अनधिकृत वाळू (Unauthorized sand transportation) करणाऱ्यांवर चांगलाच वचक बसला आहे.

(unauthorized sand transportation revenue department action)

अमळनेर तालुक्यात ‘महसूल’चा धडाका..पून्हा वाळू ट्रॅक्टर जप्त !
पन्नास दिवसानंतर आजीने धरली घरची वाट..!


तांदळी येथे बुधवारी (ता.२६) रात्री पांझरा नदीत अनधिकृत वाहतूक सुरू असल्याचे समजताच तहसीलदार मिलिंदकुमार वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली नदीपात्रात अनधिकृतपणे वाळू वाहतूक करणारे तीन ट्रॅक्टर, शहापूर तलाठी गौरव शिरसाठ, मारवड तलाठी मनोहर भावसार, जैतपीर तलाठी विकास परदेशी, अमळगाव तलाठी पराग पाटील, नंदगाव तलाठी प्रकाश महाजन, मुडी तलाठी भदाणे अप्पा, मांडळ तलाठी नीलेश पवार व बाह्मणे तलाठी सचिन बमनाथ यांनी तीन ट्रक्टर पकडून त्यांच्यावर कारवाई केली. तीनही ट्रक्टर जमा करण्यात आले आहेत. याप्रसंगी मारवड पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक राहुल फुला, पोलिस उपनिरीक्षक वैभव पेठकर व पोलिस कर्मचारी हजर होते.

महसुलचा धडाका..


गेल्या आठ दिवसांत तालुक्यात महसूल विभागातून प्रांतधिकारी सीमा अहिरे, तहसीलदार मिलिंदकुमार अहिरे, तर पोलिस खात्यातून उपविभागीय पोलिस अधिकारी राकेश जाधव, पोलिस निरीक्षक जयपाल हिरे यांच्या मार्गदर्शनाने तापी, बोरी, पांझरा नदीत अनधिकृत वाळू वाहतूक करणाऱ्यावर कारवाया झाल्याने याला आळा बसेल, असेही म्हटले जात आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()