जळगाव जिल्ह्याला जाणीवपुर्वक वगळले-गिरीश महाजन

राज्य शासनाने जाणीवपुर्वक जिल्ह्याला मदतीपासून वंचीत ठेवण्याचे काम केल्याचा आरोप त्यांनी केला.
MLA Girish Mahajan
MLA Girish Mahajan
Updated on

भडगाव : राज्य शासनाने (State government) काल अतिवृष्टीत (Heavy Rain) नुकसान झालेल्या शेतकऱ्यांसाठी (Farmers) 2 हजार 800 कोटी रूपयाची मदत जाहीर केली. मात्र यात जाणीवपुर्वक जळगाव जिल्ह्याला वगळण्यात आल्याचा आरोप माजी पालकमंत्री तथा आमदार गिरीश महाजन (MLA Girish Mahajan) यांनी केला आहे. यामुळे शेतकऱ्यांची दिवाळी काळोखात जाणार असल्याचे त्यांनी 'सकाळ' शी बोलतांना सांगीतले.

MLA Girish Mahajan
अनुदान वाटपात जळगाव जिल्ह्याच्या तोंडाला पुसले पाने

गिरीश महाजन पुढे म्हणाले की, ऑगस्ट ते ऑक्टोंबर महीन्यात जळगाव जिल्हात 5 लाख हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले. खरीप हंगाम पुर्णत: वाया गेला. अशा परीस्थीतीत शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी तातडीने मदत देण्याची आवश्यकता होती. मात्र अद्यापावेतो शेतकऱ्यांना मदत मिळालेली नाही. त्यातही शासानाने काल जाहीर केलेल्या मदतीत जळगाव जिल्ह्यालाच वगळण्यात आले आहे. त्यामुळे राज्य शासनाने जाणीवपुर्वक जिल्ह्याला मदतीपासून वंचीत ठेवण्याचे काम केल्याचा आरोप त्यांनी केला. एकीकडे अतिवृष्टीने खरीप हंगाम गेल्याने शेतकरी हवालदिल आहे. मात्र दुसरीकडे विजबिलासाठी शेतकऱ्यांचे विज कनेक्शन तोडण्याचे पाप शासन करीत आहे. त्यामुळे हे शासन शेतकऱ्यांच्या बाजून नव्हे तर विरोधात असल्याचे यानिमित्ताने स्पष्ट होते. शेतकऱ्यांना दिवाळी अगोदर मदत देऊ असे राज्यकर्ते सांगत होते. मात्र प्रत्यक्षात जळगाव जिल्ह्याच्या तोंडाला पाने पुसण्याचे काम राज्यकर्त्यांनी केले आहे. चाळीसगाव व भडगाव तालुक्यातील ऑगस्टच्या शेवटच्या आठवड्यात डोंगरात झालेल्या ढगफुटीमुळे शेती, जनावरे वाहून गेले. अनेकजण बेघर झाले. व्यवसायिकाचे प्रचंड नुकसान झाले. मात्र त्यांना ही एक छदाम या शासनाने दिलेला नाही.

MLA Girish Mahajan
धुळे : वीजपुरवठा खंडित; शेतकरी भडकले

१ नोव्हेंबरला मोर्चा

सर्वबाजुने अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांसमोर रब्बी हंगाम कसा पेरावा असा प्रश्न उभा ठाकला आहे. त्यामुळेच या निष्क्रिय शासनाला जागे करण्यासाठी 1 नोव्हेंबर ला जिल्हाधिकारी कार्यालयावर भाजपाकडुन मोर्चा काढणार असल्याचे माजी पालकमंत्री गिरीश महाजन यांनी 'सकाळ' शी बोलतांना सांगतीले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()