उघड्यावर आलेल्‍या कुटुंबाच्या मदतीला अधिकारी आले धावून

उघड्यावर आलेल्‍या कुटुंबाच्या मदतीला अधिकारी आले धावून
officer help
officer helpsakal
Updated on

भडगाव (जळगाव) : वडजी (ता. भडगाव) येथील आदिवासी कुटुंबाची झोपडी जळून (House fire) संसाराची राखरांगोळी झाली होती. या कुटुंबाची परीस्‍थिती पाहून प्रातांधिकारी, तहसिलदारासह तालुक्यातील सर्वच अधिकारी मदतीसाठी धावून आले. तर पालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांनी दोन महीना पुरेल एवढा किराणा कुटुंबाला देऊन त्यांना धीर देण्याचा प्रयत्न केला. (bhadgaon-taluka-vadaji-house-fire-family-help-in-officer)

वडजी येथे २ जूनला सकाळी साडेदहा वाजेच्या सुमारास मोहन भिल्ल या आदिवासी कुटुंबाच्या झोपडीला अचानक लाग लागली होती. आगीमुळे या कुटुंबाचा सर्व संसाराची राख झाली. त्यामुळे मोहन भिल्ल यांचे कुटुंब अक्षरश: उघड्यावर आले होते. तलाठी विलास शिंदे यांनी ७० हजार नुकसानीचा पंचनामा केला. आता घर कसे उभे करायचे अन् संसार कसा चालवायचा असा प्रश्न या गरीब कुटुंबाच्या समोर उभा ठाकला होता.

officer help
जन्मतः दोन्ही पायाने अधू..काम करणारे हातही गेले; पत्‍नी कडेवर घेवून जाते तेव्हा..

अधिकारी आले धावून..

वडजी येथील मोहन भिल्ल यांच्या झोपडीला आग लागल्याने ते कुटुंब उघड्यावर आले आहे. त्यामुळे या कुटुंबाला तातडीने शासकीय मदत देण्याबाबत उपसरपंच सुरेखा पाटील यांचे पती सुधाकर पाटील यांनी ग्रामपंचायतीच्यावतीने तहसिलदार सागर ढवळे यांना विनंती केली. त्यांनी या घटनेची शासकिय अधिकाऱ्यांच्या ग्रुपवर पोस्ट टाकली. त्‍यांच्या या पोस्टला तालुक्यातील अधिकाऱ्यांनी तत्काळ प्रतिसाद दिला. प्रातांधिकारी राजेंद्र कचरे, स्वतः तहसिलदार सागर ढवळे, पोलिस निरीक्षक अशोक उत्तेकर, गटविकास अधिकारी आर. एम. वाघ, सहाय्यक गटविकास अधिकारी संजय लखवाल, तालुका कृषी अधिकारी बी. बी. गोर्डे, महिला बालविकास प्रकल्प अधिकारी प्रशांत मिटकरी, वैद्यकीय अधिकारी डॉ. पंकज जाधव, डॉ. प्रशांत पाटील, वनअधिकारी दाभाडे, सचिन वानखेडे, तलाठी यांनी रोख मदत केली. तर भडगाव नगरपरिषदेचे मुख्याधिकारी विकास नवाळे यांनी दिड- दोन महिना पुरेल एवढा किराणा आदिवासी कुटुंबाला देऊ केला.

कुटुंब मदतीने भारावले

काम करू तरच सायंकाळी हात तोंडापर्यंत जाईल अशी या कुटुंबाची परीस्थीती आहे. अशात अचानक आग लागल्याने हे कुटुंब कोलमळले. पण अधिकार्यानी सामाजिक जाणिवेतून केलेले दातृत्वाने हे कुटुंब खुप भारावले. एव्हंढच नाही तर शासनाच्या आदिवासी कुटुंबासाठी असलेल्या घरकुल योजनेतुन प्राधान्याने लाभ देण्याबाबत तहसिलदार सागर ढवळे व गटविकास अधिकारी आर.एम.वाघ प्रयत्न करू असे आश्वासन दिले. तर इतर योजनेचा लाभ मिळवून देण्याबाबात संबधित यंत्रणेला सुचना केल्या. तर लोकप्रनिधीनीही या अडचणीत आलेल्या कुटुंबाला मदत करावी असे आवाहन करण्यात येत आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()