भडगाव : कैऱ्या तोडल्या म्हणून दलित समाजातील एका अल्पवयीन मुलाला (Minor son) शेतमालकसह (farmer) सालदाराने झाडाला बांधून ठेवल्याची संतापजनक घटना तालुक्यातील अंजनविहीरे येथे तीन दिवसापुर्वी घडली आहे. विशेष म्हणजे झाडाला बांधल्याचा व्हीडीओ (video) मोबाईलमध्ये काढून तो व्हाट्सअपवर (whatsapp) व्हायरल केला. याबाबत पोलीस ठाण्यात शेतमालकासह सालदारावर गुन्हा दाखल झाला आहे. या दोघांना पोलिसांनी (police) अटक केली आहे.
(minor boy was tied to a tree police arrested by farmer)
उल्हासनगर येथिल १७ वर्षीय दलीत युवक शिक्षण घेण्यासाठी तालुक्यातील अंजनविहीरे येथे मामा कडे आलेला होता. बारावी वर्गात शिक्षण घेणारा युवक तीन दिवसापुर्वी आपल्या आजीचे गुडघे दुखीचे औषधी घेण्यासाठी गिरड येथे गेला असता. औषधी घेऊन अंजनविहीरे येथे घरी परत येत असताना रस्त्यात त्याने गोपी पाटील याच्या शेतातील झाडाच्या कैऱ्या तोडल्या. त्यावेळी सालदार प्रवीन पावरा याने त्याला जाब विचारत शेत मालक विवेक रविद्र पाटील ऊर्फ गोपी पाटील यांस फोन करून शेतात बोलावून घेतले.
"मामा ! माझी चुक झाली..
नंतर दोघांनी मुलाला मारहाण करत दोराच्या सहाय्याने चिकूच्या झाडाला बांधले. यावेळी 'तो' युवक शेत मालकास "मामा ! माझी चुक झाली, पुन्हा अस करणार नाही. असे विनवणी करत होता. यावेळी गोपीने त्याचा व्हीडीओ मोबाईलमध्ये काढत सदरचा व्हिडिओ व्हॉट्सअपवर व्हायरल केला. तसेच पुन्हा कैऱ्या तोडायला आला तर हातपाय तोडण्याची धमकी दिली. या घटनेनंतर पीडित मुलाने घडलेला प्रकार आपले मामा व आजीला व इतर नातेवाईक यांना सांगितला.
संशयीतांना अटक
याबाबत दिनाक ६ जुन रोजी रात्री उशिरा भडगाव पोस्टेला दलीत युवक (वय १७) याने दिलेल्या फीर्यादी वरुन भादवी कलम ३४२, ३२४, ३२३, ५०४, ५०६, ३४, अनुसुचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक अधिनियम १९८९ चे ३ (१), सी, आर, एस, व माहिती तंत्रज्ञान (सुधारणा) अधिनियम २००८ चे ६६ सी प्रमाणे गुन्हा दाखल करुन विवेक रविद्र पाटील ऊर्फ गोपी पाटील, प्रवीण पावरा यांना अटक झाली आहे. त्यांना जळगाव येथे विशेष न्यायालयात हजर केले असता त्यांना न्यायालयीन कस्टडी सुनावली आहे. पुढील तपास डीवायएसपी कैलास गावडे करीत आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.