रस्त्यातील डबक्यात चालविल्या नाव;भुसावळला भाजयुमोचे आंदोलन

येत्या दोन ते तीन दिवसांत शहरातील खड्डे बुजवावेत, अन्यथा जनआंदोलन करण्यात येईल, असा इशारा भाजयुमोने या वेळी दिला.
Movement
Movement
Updated on



भुसावळ : शहरातील रस्त्यांवर मोठमोठी खड्डे पडले (Pits in the road)असून, रस्त्यांची अक्षरश: चाळण झाली आहे. दोन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे (Rain) रस्त्यांमध्ये डबके साचले असून, या डबक्यांना तळ्याचे स्वरूप आले आहे. त्यामुळे वाहनधारकांना त्रास सहन करावा लागत आहे. याकडे पालिकेचे लक्ष वेधण्यासाठी भाजयुमोतर्फे (BJP Youth) भाजयुमोचे शहराध्यक्ष अनिरुद्ध कुलकर्णी यांच्या नेतृत्वाखाली जामनेर रोडवरील डबक्यांमध्ये कागदी नाव सोडून आंदोलन (Movement) करण्यात आले.

Movement
जळगाव जिल्ह्यात २४ तासांत ५० मिलिमीटर पाऊस


येत्या दोन ते तीन दिवसांत शहरातील खड्डे बुजवावेत, अन्यथा जनआंदोलन करण्यात येईल, असा इशारा भाजयुमोने या वेळी दिला. आंदोलनात उपाध्यक्ष अथर्व पांडे, गोपीसिंग राजपूत, राहुल मेहरानी, अमित आसोदेकर, चेतन बोरोले, चिटणीस नागेश खरारे, चेतन सावकारे, मयूर अंजाळेकर, कोशाध्यक्ष देवेश कुलकर्णी, प्रसिद्धिप्रमुख प्रशांत भट, सदस्य सागर महाजन, प्रणव डोलारे व कार्यकर्ते सहभागी झाले होते.

Movement
जळगावातील मेडिकल हबचे काम मार्गी लागणार -वैद्यकीय शिक्षणमंत्री


शहरवासीयांच्या प्रश्नांवर भाजयुमो आक्रमक
शहरात रस्ते, साफसफाई, पथदिवे आदी समस्या भेडसावत असून, पालिकेचे त्याकडे दुर्लक्ष होत आहे. विरोधक मात्र यावर एकही शब्द बोलत नसून, ‘तेरी भी चुप, मेरी भी चुप’, अशी भूमिका घेत आहे. असे असताना शहरातील समस्यांकडे लक्ष वेधण्यासाठी भारतीय जनता युवा मोर्चाकडून शहराध्यक्ष अनिरुद्ध कुलकर्णी यांचा नेतृत्वाखाली वारंवार आंदोलन करून लक्ष वेधण्यात येत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.