नो टेंशन.. लॉकडाऊनमध्ये बँकेतील पैसेही मिळणार घरपोच

पोस्ट विभागाने एक उपाययोजना आखली आहे. एखाद्या व्यक्तीचे कोणत्याही बँकेत आणि पोस्टात खाते असल्यास त्या व्यक्तीला पैशांसाठी बँकेत जाऊन रांग लावण्याची गरज नाही.
indian post
indian postindian post
Updated on

भुसावळ : कोरोनामुळे राज्यात लॉक डाउन करण्यात आले आहे. शा वेळेस कोणत्याही बँकेतून पैसे हवे असतील, तर पोस्ट तुमच्यापर्यंत ते पैसे पोहोचवणार आहेत. बँकांमध्ये पैसे काढण्यासाठी होणारी गर्दी टाळण्यासाठी पोस्ट विभागाने हा निर्णय घेतला असून, त्यामुळे पोस्टाद्वारे बँक खात्यातील पैसे घरपोच मिळणार आहेत. आतापर्यंत भुसावळ विभागात एकूण 52 हजार 707 ग्राहकांनी या योजनेचा लाभ घेतला असून, 16 कोटी 45 लाख 44, 781 रुपये वाटप करण्यात आले आहेत.

लॉकडाउनचा कालावधी आणखी 15 दिवसांसाठी (30 एप्रिलपर्यंत) वाढवण्यात आला आहे. अशा परिस्थितीत नागरिकांना रोख रकमेची आवश्यकता भासू शकते. एटीएमवरही भार येण्याची शक्यता नाकारता येत नसल्याने बँकांमध्ये गर्दी वाढू शकते. याकरिता पोस्ट विभागाने एक उपाययोजना आखली आहे. एखाद्या व्यक्तीचे कोणत्याही बँकेत आणि पोस्टात खाते असल्यास त्या व्यक्तीला पैशांसाठी बँकेत जाऊन रांग लावण्याची गरज नाही. पोस्टाशी संपर्क साधल्यास पेमेंट बँकेद्वारे तुमच्या घरापर्यंत पोस्टाचा कर्मचारी पैसे घेऊन दाखल होणार आहे.

जेष्ठ नागरिकांना लाभ

'अधिकाधिक ज्येष्ठ नागरिकांना पेमेंट बँक योजनेचा फायदा होत असून, आतापर्यंत महाराष्ट्रातील पोस्टाच्या शेकडो ग्राहकांनी या योजनेचा लाभ घेऊन घरपोच पैसे स्वीकारले आहेत,' अशी माहिती पोस्ट विभागाकडून देण्यात आली आहे. 'पोस्टाच्या ग्राहकांनी विनाकारण बँकांमध्ये गर्दी न करता या योजनेचा लाभ घेत पैसे काढावेत,' असे आवाहनही विभागातर्फे करण्यात आले आहे.

असे काढता येतील पैसे

तुमचे पेमेंट बँकेत खाते असल्यास आणि त्याला मोबाइल व आधार क्रमांक लिंक असल्यास जवळच्या पोस्ट कार्यालयात संपर्क साधून या योजनेचा लाभ घेणे शक्य आहे. तुम्ही योजनेसाठी अर्ज दिल्यानंतर पुढील काही दिवसात पैसे घरपोच मिळू शकतील.

तालुकानिहाय आकडेवारी

तालुक्याचे नाव। व्यवहार। रक्कम

भुसावळ। 9,918 3,32,46,616

बोदवड। 3,484 1,18,93,330

मुक्ताईनगर। 3,788 1,48,49,725

जामनेर। 6,241 1,98,15,825

रावेर। 6,417 2,29,52,561

यावल। 7,856 2,41,56,045

चोपडा। 15,003 16,45,44,781

राज्यात लॉकडाउन सुरू झाल्यावर पेमेंट बँक योजना सुरू करण्यात आली. इतर बँक आणि पोस्ट पेमेंट बँकेत खाते असलेल्या ग्राहकांसाठी पैसे काढण्याचा उत्तम पर्याय आहे. बँकांमध्ये गर्दी करून धोका पत्करण्याची गरज नसून घरी बसूनच पैसे मिळवता येतील. पेमेंट बँकेच्या खातेदारांनी याचा अधिकाधिक लाभ घ्यावा.

- यु. पी. दुसाने, डाक अधीक्षक भुसावळ

संपादन- भूषण श्रीखंडे

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()