घरफोडीचा डाव साधला..मात्र चोरट्यांची झाली पंचाईत

चोरट्यांना न्यायालयात हजर केले असता त्यांना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली.
police
police
Updated on

भुसावळ : तालुक्यातील कुर्हे पानाचे येथे भरदिवसा चोरटयांनी (Thief) बंद घरातून अडीच ग्रॅम वजनाचे दागिने लांबवले होते. या प्रकरणी तालुका पोलीस ठाण्यात ( Taluca Police station) गुन्हा दाखल करण्यात आला होता. चोरट्यांनी चोरीनंतर हे दागिने मोडण्यासाठी सराफाचे दुकान गाठले. मात्र सराफाने (Gold shop) पावतीविना दागिने घेण्यास नकार दिल्याने चोरटे आल्या पावली माघारी परतले. मात्र खबऱ्यापर्यंत ही बातमी पोहोचताच त्याने पोलिसांना माहिती दिल्यानंतर चोरटे तालुका पोलिसांच्या जाळ्यात अडकले.

police
कपाशीच्या पीकविम्यात पीक कापणीचा अडसर

वैभव संजय बावस्कर (वय 22) व महेश गोपाल वराडे (वय 22, कुऱ्हे पानाचे) अशी अटकेतील आरोपींची नावे असून एका अल्पवयीन बालकासही या प्रकरणी ताब्यात घेण्यात आले आहे. चोरट्यांना न्यायालयात हजर केले असता त्यांना दोन दिवसांची (13 पर्यंत) पोलीस कोठडी सुनावण्यात आली. पोलीस उपअधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांच्या मार्गदर्शनाखाली तालुका पोलीस ठाण्याचे निरीक्षक रामकृष्ण कुंभार, सहा.निरीक्षक अमोल पवार, हवालदार युनूस शेख, नाईक राजेंद्र पवार, उमेश बारी आदींनी आरोपींना अटक केली.

police
पीक पाहणी आता होणार मोबाइल अॅपवर!

भर दिवसा झाली होती चोरी

कुऱ्हे पानाचे येथील पुंडलिक संपत सपकाळे (वय 59) यांच्या बंद घरातून चोरट्यांनी 10 रोजी सकाळी 10.30 ते 11.30 वाजेदरम्यान 12 हजार 500 रुपये किंमतीचे अडीच ग्रॅम वजनाचे सोन्याचे टोंगल लांबवले होते. या प्रकरणी अज्ञात चोरट्यांविरोधात तालुका पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता. दरम्यान, तालुका पोलिसांनी या गुन्ह्याची उकल करीत दोघा आरोपींकडून अडीच ग्रॅम वजनाचे टोंगल जप्त केले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()