दीपनगरचे दोन संच पुन्हा कार्यान्वित; राज्यात विजेची मागणी वाढली!

विजेची मागणी वाढल्यामुळे ५०० मेगावॉटचे दोन्ही संच सुरू करण्यात आले आहेत.
Deepanagar Power Station
Deepanagar Power StationDeepanagar Power Station
Updated on

भुसावळ : राज्यात विजेची मागणी वाढल्याने (Demand for electricity increased) येथील वीजनिर्मिती प्रकल्पातील संच क्रमांक चार व पाच २ जुलैपासून पुन्हा सुरू करण्यात आले आहेत. २१ दिवसांनी वीज संच पुन्हा कार्यान्वित करण्यात आले असून, यातून आता एक हजार मेगावॉट वीजनिर्मिती होणार असल्याची माहिती दीपनगर प्रशासनाने दिली. राज्यात लाॅकडाउनमुळे (Lockdown) विजेची मागणी कमी झाली होती. दीपनगर वीजनिर्मिती प्रकल्पातील ५०० मेगावॉट क्षमतेचे दोन संच बंद करण्यात आले होते. हे दोन्ही संच ८ जूनपासून प्रशासनाला बंद करण्याची वेळ आली होती. २१० मेगावॉट क्षमतेचा संच क्रमांक तीन बंद असल्याने दीपनगर वीजनिर्मिती केंद्रातून (Deepanagar Power Station) होणारी एक हजार २१० मेगावॉट विजेची निर्मिती पूर्णपणे ठप्प झाली होती. मात्र, विजेची मागणी वाढल्यामुळे दीपनगर वीजनिर्मिती केंद्रातील ५०० मेगावॉटचे दोन्ही संच शुक्रवारी दुपारी बारापासून सुरू करण्यात आले आहेत. त्यामुळे दोन्ही संचांमधून हजार मेगावॉट वीजनिर्मिती सुरू असल्याचे जनसंपर्क अधिकारी सचिन कवितके यांनी सांगितले. ( state in the electricity demand increased deepanagar power station two set start)

Deepanagar Power Station
बीएचआर घोटाळा; कंडारेला पळवणारे अन्‌ मदतगार रडारवर


कोळशाचा मुबलक साठा
सध्या पावसाळा सुरू असला तरी ओल्या कोळशाची समस्या नाही. कोळसा पूर्णपणे झाकलेला असल्याने तो ओला होण्याची शक्यता नसते. दीपनगर प्रशासनाकडे सध्या मुबलक कोळशाचा साठा शिल्लक असल्याचेही त्यांनी सांगितले.

Deepanagar Power Station
जळगाव जिल्ह्यात पहिल्या, दुसऱ्या लाटेतील नीचांकी रुग्णसंख्या

संच बंदचे काय आहे कारण
दीपनगर औष्णिक वीजनिर्मिती केंद्रातील २१० मेगावॉटचा संच क्रमांक तीन विजेची मागणी कमी झाल्याने ८ जूनला बंद करण्यात आला होता, तर ५०० मेगावॉटचे दोन्ही संच ११ जूनला बंद करण्यात आले होते. राज्याची विजेची मागणी घटली, तसेच दीपनगर केद्रातून निर्मिती होणाऱ्या विजेपेक्षा खासगी क्षेत्रातील विजेचे मूल्य कमी होते. यामुळे एमओडी अर्थात, मेरिट ऑर्डर डिस्पॅचनुसार दीपनगरचे संच बंद करण्यात आले होते. या वेळी कोरोनाचे काही निर्बंध असल्यानेही विजेची मागणी कमी होती. मात्र, आता मागणी पुन्हा वाढत आहे.

Deepanagar Power Station
‘ओबीसी’ आरक्षणावरून भाजपकडून जातीजातीत तेढ

दीपनगरचे वीजमूल्य २.८९ रुपये
राज्यात महावितरणची वीज मागणी १५ ते १७ हजार ५०० मेगावॉट आहे, तर देशात १९ हजार ९०० मेगावॉट विजेची मागणी आहे. यामुळे दीपनगरातील ५०० मेगावॉट स्थापित क्षमतेचे संच २१ दिवसांनी लाइटअप करण्यात आले. सायंकाळी यातून विजेची निर्मिती सुरू झाली. दीपनगर औष्णिक केद्रातून निर्मिती विजेचे मूल्य मेमध्ये दोन रुपये ८९ पैसे आहे. कोळशाची हाताळणी, वाहतूक व अन्य खर्चांवर हे मूल्य ठरते. कोळसा खाणींच्या क्षेत्रात असलेल्या वीज प्रकल्पात हाताळणी व वाहतूक खर्च कमी असल्याने तेथील मूल्य कमी असते. त्यामुळे हे संच कार्यान्वित राहतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.