कोरोनामूळे प्रवासी धास्तावले; मुंबई पुण्याकडे रेल्वे धावताहेत रिकाम्याच

रेल्वेने यापूर्वीच नियमित फेऱ्यांमध्ये मोठी कपात केली आहे. रेल्वेलाही पुरेसे प्रवासी मिळत नसल्याचे चित्र आहे.
indian railway
indian railwayindian railway
Updated on

भुसावळ : देशासह महाराष्ट्रात कोरोनामुळे भयावह स्थिती दिसून येत आहे. भीतीपोटी प्रवासाचे बेत रद्द केले जात आहेत. यामुळे रेल्वे गाड्यांमध्ये पुरेसे प्रवासीच नसल्याचे चित्र आहे. नागपूर, मुंबई, पुण्याकडील गाड्यांमधील प्रवाशांची संख्या फारच कमी झाली आहे. प्रवासी संख्या कमी असल्याच्या कारणावरून रेल्वेगाड्या रद्द करण्याचा क्रमही आता सुरू झाला आहे. नागपूर-पुणे, अमरावती-पुणे, नागपूर-अहमदाबादकडील तब्बल अकरा विशेष गाड्या दोन आठवड्यांसाठी रद्द करण्यात आल्या आहेत.

indian railway
जळगाव जिल्ह्यात पंधराच दिवसांत अडीचशे जणांचा मृत्यू

खबरदारीचा उपाय म्हणून नागरिक बाहेरगावी जाणेच नव्हे, तर घराबाहेर पडणेदेखील टाळत आहेत. एसटी आणि रेल्वेतील प्रवासीसंख्येनेच ही बाब अधोरेखित केली आहे. रेल्वेने यापूर्वीच नियमित फेऱ्यांमध्ये मोठी कपात केली आहे. रेल्वेलाही पुरेसे प्रवासी मिळत नसल्याचे चित्र आहे. प्रवासी संख्या घटत राहिल्यास पुढील काळात आणखी गाड्या रद्द केल्या जाऊ शकतात. रेल्वेच्या नियमानुसार विशेष गाड्या केव्हाही रद्द करण्याची किंवा चालविण्याची मुभा असते.

indian railway
नोंदणीच नाही तर मदत कशी मिळणार..बांधकाम, घरेलू कामगारांसमोर प्रश्न

तिकीट विक्री खालावली

एरवी हजारोंच्या संख्येने तिकीट विक्री केली जाते. मुलांना सुट्या लागण्यासह पर्यटन व लग्नसराईचा काळ असल्याने एप्रिल व मेमधील तिकीट विक्री उच्चांकी पातळीवर असते. यंदा मात्र तिकीट विक्री चांगलीच रोडावली आहे.

निगेटिव्ह सर्टिफिकेट बंधनकारक

राजस्थान सरकारने महाराष्ट्र, मध्य प्रदेश, गुजरात, पंजाब, हरियाना, केरळमधून येणाऱ्या प्रवाशांना आरटीपीसीआर तपासणीसह निगेटिव्ह सर्टिफिकेट बंधनकारक केले आहे. हे प्रमाणपत्र ७२ तासांच्या आतील असणे आवश्यक आहे. तमिळनाडू सरकारनेही रेल्वे प्रवाशांना ई-पास बंधनकारक केले आहेत.

संपादन- भूषण श्रीखंडे

indian railway
जळगावमध्ये नव्याने साकारतेय तीनशे बेडचे जम्बो कोविड सेंटर

या विशेष गाड्या रद्द

- पुणे- नागपूर विशेष - २९ एप्रिलपर्यंत

- नागपूर-पुणे विशेष- ३० एप्रिलपर्यंत

- पुणे-अजनी- १७ एप्रिल ते १ मे

- अजनी-पुणे- १८ एप्रिल ते २ मे

- पुणे-अमरावती- २१ ते २८ एप्रिल

- अमरावती-पुणे- २२ ते २९ एप्रिल

- नागपूर-पुणे- १ मेपर्यंत

- पुणे- नागपूर- २९ एप्रिलपर्यंत

- नागपूर- अहमदाबाद २१ ते २८ एप्रिल

- अहमदाबाद- नागपूर- २२ ते २९ एप्रिल

- पुणे- अजनी- २३ ते ३० एप्रिलपर्यंत

संपादन- भूषण श्रीखंडे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.