‘पिकेल ते विकेल’ संकल्पनेतून शेतकऱ्याने घेतले लाखोंचे उत्पन्न

Jalgaon Farmer News : भाजीपाला उत्पादक ते विक्रेता, अशा पद्धतीने व्यापाऱ्यांची साखळी तोडल्याने त्यांना चांगले उत्पन्न मिळत आहे.
 Chilli grower farmer
Chilli grower farmer Chilli grower farmer
Updated on

बोदवड : ‘पिकेल ते विकेल’ ही संकल्पना मनात ठेवून सुरवाडे खुर्द येथील भाजीपाला उत्पादक (Vegetable grower farmer) ते विक्रेता (Seller)असलेला शेतकरी नीलेश जवरे यांचा पिढीजात भाजीपाल्याचा व्यवसाय अविरत सुरू आहे. साधारणत: एक हेक्टरवरील क्षेत्रापैकी एक एकरावर नियोजन करीत भाजीपाला लावला जातो. थेट पणजोबांपासून हा व्यवसाय अविरत सुरू आहे.
(jalgaon district surwade village farmer income of lakhs earned from chilli)

 Chilli grower farmer
आमदारांत रस्सीखेच;ब्रेक टेस्ट ट्रॅक सेंटर भडगाव की चाळीसगावात?

श्री. जवरे यांच्या शेतात पूर्वजांच्या काळातील म्हणजेच १०० वर्षे जुनी विहीर आहे. त्याकाळी विजेची उपलब्धता नसल्याने मोटेच्या सहाय्याने पाणी देत असल्याचे शेतकरी नीलेश जवरे यांनी सांगितले. शेतकऱ्यांच्या खिशाला कात्री लावणाऱ्या व्यापाऱ्यांच्या हातात मेहनतीने पिकवलेला माल जाऊ न देता स्वत: परिसरातील छोट्या-मोठ्या बाजारात ‘पिकेल ते विकेल’ या हेतूने स्वत: भाजीपाला विकतात. सुरवाडे खुर्द, मुक्तळ, कुऱ्हे पानाचे तसेच जवळच्या परिसरात बाजार भरत असतो. या कुटुंबातील एकही सदस्य नोकरीला नसून या भाजीपाला विक्रीच्या व्यवसायावर उदरनिर्वाह चालवितात. त्यांना या व्यवसायात वडील शंकर जवरे व मोठे बंधू गणेश जवरेही मदत करतात. गुरुवारी सुरवाडे येथील बाजार, शुक्रवारी मालदाभाडी येथील बाजार, शनिवारी मुक्तळचा बाजार, सोमवारी कुऱ्हे पानाचे येथील बाजार व असा दिनक्रम असतो.

भाजीपाल्यांचे उत्पादन
यंदा श्री. जवरे यांनी १६ मेस मिरची लागवड केली असून, अवघ्या ५० ते ६० दिवसांत ती बाजारात विक्रीसाठी तयार आहे. शेतात ‘प्रजेला’ जातीची मिरची, काटेरी वांगे, भरीत वांगे, पालक, पोकळा, आंबट चुका, उन्हाळ कांदा, मेथी असे अन्य भाजीपाल्यांचे उत्पादन घेतले जाते.

 Chilli grower farmer
जळगाव जिल्ह्यात आजपासून ‘अनलॉक’ नाहीच!


शेतीतून ‘एनी टाइम मनी’
प्रगतिशील शेतकरी नीलेश जवरे यांच्या शेतात मिरचीचे उत्पादन चांगले आले असून, त्यांनी या हंगामात नारळ फोडून मिरची तोडणीला सुरवात केली आहे. भाजीपाला उत्पादक ते विक्रेता, अशा पद्धतीने व्यापाऱ्यांची साखळी तोडल्याने त्यांना चांगले उत्पन्न मिळत आहे. त्यामुळे त्यांचे शेत म्हणजे ‘एनी टाइम मनी’ (एटीएम) ठरत आहे. या पद्धतीने शेती केल्याने त्यांना कुणाकडेही पैशांसाठी हात पसरण्याची गरज पडत नसल्याचे श्री. जवरे सांगतात.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()