चाळीसगाव तालुक्यात पावसाने पाठ फिरवल्याने शेतकरी संकटात आला असतांनाच महातिवरण कंपनीच्या वीज कनेक्शन कपातीचा सपाटा लावला आहे.
मेहुणबारे (ता.चाळीसगाव): आधीच पाऊस (Rain) नसल्याने शेतकरी (Farmer) मेटाकुटीस आलेला असतांना महावितरण कंपनीकडून (MSEDCL) पुन्हा एकदा शेतीपंपांचा वीज पुरवठा खंडीत (Power cut) करण्याचे प्रकार घडत आहेत वरखेडे (ता.चाळीसगाव)येथील बहिरोबा फिटरवरील 35 डिपींपैकी 5 डिपींवरील वीज पुरवठा तब्बल 12 दिवसापासून कट करण्यात आल्याने सुमारे 100 शेतकऱ्यांना (Farmers( त्याचा फटका बसत आहे. विहीरींना थोडेफार पाणी असूनही ते वीज अभावी पिकांना देता येत नसल्याने शेतकरी हतबल झाला आहे.
यावर्षी चाळीसगाव तालुक्यात पावसाने पाठ फिरवल्याने शेतकरी संकटात आला असतांनाच महातिवरण कंपनीच्या वीज कनेक्शन कपातीचा सपाटा लावला आहे.तीन महिन्यापूर्वीही महावितरणने तालुक्यातील शेतीपंपाचा वीज पुरवठा खंडीत केला होता त्यातून जळगावात वीज कंपनीच्या अधिकाऱ्यास खुर्चीला बांधण्याचा प्रकार घडला होता.आता पुन्हा वीज बिल भरले नाही म्हणून शेतीपंपाचा वीज पुरवठा खंडीत केला जात आहे.
पिके वाचविण्याची धडपड..
वरखेडे (ता.चाळीसगाव)येथे बहिरोबा फिटरवरील एकुण 35 शेतीपंपाच्या डिप्या(रोहीत्र) आहेत त्यापैकी 5 डिप्यांवरील शेतीपंपांचा वीज पुरवठा गेल्या 12 दिवसापासून खंडीत करण्यात आला आहे. त्यामुळे या डिप्यांवर शेतीपंपाचा वीज पुरवठा घेतलेल्या शेकडो शेतकऱ्यांवर संकट आले आहे.महिन्याभरापासून पाऊस नसल्याने शेतकरी पिके वाचविण्यासाठी धडपड करीत असून विहीरीच्या पाण्यावर पिकांना पाणी देण्याची धडपड सुरू आहे.मात्र 12 दिवसापासून वीज पुरवठा ठप्प असल्याने पिकांना पाणी देता येत नसल्याने पिके नष्ट होण्याच्या मार्गावर आली आहेत.
गुरांचा पाण्याचा प्रश्न गंभीर
गुरांंचा पाण्याचा प्रश्न देखील गंभीर बनला आहे. खरीप हंगामात शेतकऱ्यांनी आहे तो पैसा खर्च केल्याने हाती पैसा नाही अशा स्थितीत नवीन पिक हाती येईपर्यंत महावितरणने दिलासा देणे गरजेचे असतांना वीज बिल भरले नाही म्हणून महावितरणने शेतीपंपाचा वीज पुरवठा खंडीत केल्याने शेतकरी हतबल झाले आहेत.याचबरोबर गुरांना देखील पिण्याच्या पाण्यासाठी वनवन करत भटकंती करावी लागत असल्याचे त्या भागातील शेतकऱ्यांनी सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.