मेहुणबारे (ता.चाळीसगाव ) : खेडगाव (ता.चाळीसगाव) येथे गावाजवळील शेतातील विहरीत सप्टेंबर महीन्यात एका पुरूषाचा मृतदेह (Death) आढळून आला. मृतदेह अत्यंत कुजलेल्या अवस्थेत मिळून आल्याने त्याची ओळख पटली नाही.या प्रकरणी मेहूणबारे पोलीसात अकस्मात मृत्युची नोंद केली गुन्ह्याबाबत कोणताही स्पष्ट पुरावा नसतांना पोलीसांनी (Police) एका महिन्यात अत्यंत शिताफीने तपास करून खून्यांपर्यंत पोहचत गुन्ह्याचा उलगडा केला. तो मृत तरूण बोरखेडा खुर्द येथील असून शेतात काम करीत नाही म्हणून लाथ मारून विहीरीत ढकलून दिले व ही बाब कुणाला सांगितली नसल्याची बाब तपासात समोर आली पोलीसांनी अत्यंत खोलात जावून सुतावरून स्वर्ग गाठत मोबाईलच्या सीडीआर व एसडीआर वरून शिताफीने हा तपास लावला मेहूणा व शालकाला खुनाप्रकरणी अटक करण्यात आली असून त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली आहे मेहूणबारे पेालीसांच्या या कामगिरीचे कौतुक होत आहे.
खेडगाव येथील विशाल मुसळे यांच्या गावानजीक असलेल्या शेतातील विहीरीत (ता.23) सप्टेंबर 2021 रोजी दुपारी एका अनोळखी व्यक्तीचा मृतदेह आढळून आला. पोलीस पाटलांनी या घटनेची माहिती मेहूणबारे पोलीसांना दिल्यानंतर उपनिरीक्षक योगेश बोडके व पोलीस कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी जावून पंचनामा केला. हा मृतदेह अत्यंत कुजलेला असल्याने त्याची ओळख पटली नाही. तीन चार दिवसापासून या व्यक्तीचा मृतदेह विहीरीत पडलेला असावा असा अंदाज आहे. वैद्यकीय अधिकारी डॉ. मंदार करंबेळकर यांनी जागेवरच मृतदेहाचे शवविच्छेदन केले.याप्रकरणी मेहूणबारे पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली होती.
बेपत्ता झाल्याची तक्रार
या घटनेचा तपास करीत असतांनाच 5 ऑक्टोबर रेाजी बोरखेडा खुर्द येथील अजाबराव पाटील यांनी मेहूणबारे पोलीस ठाण्यात धाव घेऊन भाऊ सोमनाथ प्रभाकर पाटील (वय35) हा बेपत्ता झाल्याची तक्रार दिली. (ता. 21) सप्टेंबर रोजी सकाळी भाऊ सोमनाथ हा गावातील भिकन पाटील याचे सोबत त्याच्या मोटारसायकलवर बसून गेला तो परत आलाच नाही भिकन पाटील याला विचारले असता त्याने त्याच दिवशी सोमनाथ हा न्हावे येथे उतरल्याचे सांगितले पोलीसांनी अकस्मात मृत्युबाबत सोशल मीडियावर व्हायरल केलेल कपडे व बुट हे भिकन पाटील सोबत गेलेल्या भाऊ सोमनाथ याचेसारखेच कपडे असल्याचा आम्हाला संशय असल्याचे अजाबराव पाटील यांनी पोलीसांना सांगितले पोलीसांनी त्यांना कपडे व बूट दाखविले असता ते भाऊ सोमनाथचे असल्याचे सांगितले.
असा केला बनाव..
मृत सोमनाथ याचा विहीरीत कुजलेला मृतदेह सर्वप्रथम पाहणारा भटू वसंत सोनवणे रा कळमडू हा (ता.21) सप्टेंबर रोजी मयत सोमनाथ पाटील यास मोटारसायकलवर घेेऊन जाणाऱ्या भिकन पाटील याचा सख्खा शालक आहे. अजाबराव पाटील यांनी पोलीसांना दिेलेल्या जबाबात भाऊ सोमनाथला मोटारसायकलवर घेऊन गेल्याबाबत व तो रात्री घरी परत आला नाही याबाबत विचारले असता सोमनाथ हा न्हावे येथे 10 मिनीटात येतो असे सांगून दारू पिण्यास गेला तो परत आलाच नाही व तो नातेवाईकांकडे गेला असावा असे समजून मी खेडगावकडे गेला असे नमुद केल्याचे म्हटले आहे.
पोलिसांनी फिरवली चक्रे
अजाबराव पाटील यांनी भिकन पाटील व त्याचा शालक भटू सोनवणे यांच्यावर भाऊ सोमनाथच्या घातपातचा संशय व्यक्त केला हा धागा पकडत पोलीसांनी तपासाची चक्रे फिरवत भिकन पाटील व भटू सोनवणे यांचे मोबाईल क्रमांकाचे सीडीआर व एसडीआर मिळवले आणि (ता. 11) ऑक्टोबर रेाजी दोघांचे जाब जबाब नोंदवले जबाबात संशयित भिकन याने 21 सप्टेंबर रोजी खेडगाव येथे शेतात सोमनाथ याने त्यांचे सोबत काम केले व दुपारी खाजगी कामाकरीता खाजगी वाहनाने बोरखेडा येथे निघून गेल्याने सांगितले तर मयताचे प्रेत सर्वप्रथम पाहणाऱ्या संशयित भटू सोनवणे याने 23 सप्टेंबर रोजी दुपारी 2.30 वाजेच्या सुमारास मृतदेह पाहिला तेव्हापासून 26 सप्टेंबरपर्यंत मेहूणा भिकन याचे सोबत संपर्क केला नाही असे असा जबाब नमुद केला.
खाक्या दाखवताच बोलु लागले
या गुन्ह्याचा तपास जळगाव जिल्हा पोलीस अधीक्षक डाँ.प्रविण मुंडे, अप्पर पोलिस अधीक्षक रमेश चोपडे, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रकाश गावडे,यांच्या मार्गदर्शनाखाली मेहुणबारे पोलीस ठाण्याचे साहाय्यक पोलीस निरीक्षक पवन देसले, उपनिरीक्षक हेमंत शिंदे प्रकाश चव्हाणके,योगेश बोडके, हवालदार सिद्धांत शिसोदे,गोरख चकोर, शैलेश माळीसह पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली व पोलीसांनी भिकन व भटू यांचे मोबाईल ताब्यात घेऊन त्यांचे सीडीआर व एसडीआर पाहीले असता सोमनाथ याचे प्रेत मिळाल्याच्या घटनेनंतर दुपारी अनेकवेळा संपर्क केल्याचे तसेच त्यांच्या जबाबाबत घटनेसंबंधी विसंगती आढळून आल्याने या दोघांना पुन्हा शुक्रवार (ता.29) रोजी ताब्यात घेऊन पोलीस खाक्या दाखवला असता दोघांनी सोमनाथला विहिरीत ढकलून देत खून केल्याची कबुली दिली.
काम करत नाही म्हणून खुन..
सोमनाथ हा दारू पिवुन भिकनच्या शेतात आला असता भिकन पाटील याने तु दारु प्यायला आला आहे, की काम करायला अशी शिवीगाळ केली असता सोमनाथ पाटील व भिकन पाटील यांच्यात हाणामारी झाली या भांडणात भिकन याने शेतात काम करीत नाही म्हणून खेडगाव येथील माध्यमिक विद्यालयाच्या मागील दत्तात्रय कोठावदे यांच्या शेतातील विहीरीत सोमनाथला लाथ मारून ढकलून दिले व तो विहिरीत बुडाल्याची माहिती कुणाला न देता घरी निघुन गेला व सोमनाथ हा दारू पिण्यास गेला असता परत आलाच नाही अशी बतावणी केली तर 23 सप्टेंबर रोजी सोमनाथचा मृतदेह विहिरीतून वर आला असता भिकन पाटील याने शालक भटू सोनवणे यास फोन करून या प्रकाराची कुठेही वाच्चता न करण्याबाबत सांगितले त्यामुळे भटूने देखील ही माहिती लपवून ठेवली याप्रकरणी पोना प्रतापसिंग मथूरे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून मेहूणबारे पोलीस ठाण्यात सोमनाथ प्रभाकर पाटील याचा विहीरीत ढकलून खून केल्याप्रकरणी संशयित भिकन पाटील रा बोरखेडा खुर्द व भटू सोनवणे कळमडू या दोघांच्या विरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.