कोरोनामुळे शिक्षण क्षेत्रात आमूलाग्र बदल झाला आहे. याबाबत प्रातिनिधिक स्वरूपात भडगाव महाविद्यालयाच्या गुणवत्ता सुधार समितीतर्फे ग्रामीण भागात सर्वेक्षण करण्यात आले.
भडगाव : ऑनलाइनमुळे (Online) जागतिक स्तरावरील तज्ज्ञ व्यक्तींचे शैक्षणिक विचार व संवादकौशल्य आत्मसात करता येतात. मात्र ऑनलाइन शिक्षणाला (Online education) नेटवर्क कनेक्टिव्हिटीची ४० टक्के विद्यार्थ्यांना अडचण येत असल्याचे येथील र. ना. देशमुख महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी केलेल्या सर्वेक्षणातून (Student surveys) समोर आले आहे.
कोरोनामुळे शिक्षण क्षेत्रात आमूलाग्र बदल झाला आहे. याबाबत प्रातिनिधिक स्वरूपात भडगाव महाविद्यालयाच्या गुणवत्ता सुधार समितीतर्फे ग्रामीण भागात सर्वेक्षण करण्यात आले. यासाठी महाविद्यालयातील विविध शाखेतील विद्यार्थ्यांकडून गुगल फॉर्म ऑनलाइन स्वरूपात भरून घेण्यात आला. या सर्वेक्षणात विद्यार्थ्यांच्या ऑनलाइन शिक्षणाविषयी अडीअडचणी व त्यांच्या सामाजिक, मानसिक, शारीरिक, आर्थिक बाबींचा आढावा घेण्यात आला. या सर्वेक्षणात महाविद्यालयातील १४१ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. ऑनलाइन शिक्षणामुळे शिक्षकांना देखील नवीन तंत्रज्ञान आत्मसात करावे लागले. मोबाईल फक्त संवादाचे व व्हॉट्सॲपद्वारे आपल्या भावना व्यक्त करण्याचे साधन न राहता खऱ्या अर्थाने एक शैक्षणिक संसाधन झाल्याचे सर्वेक्षण दिसून आले. गुगल मीट, झूम, यूट्यूब, पीपीटी यांचा प्रभावी व योग्य वापर करणे शिक्षकांना क्रमप्राप्त झाले.
सर्वेक्षणातील ठळक वैशिष्ट्ये
ऑनलाइन शिक्षणाविषयी ५० विद्यार्थ्यांनी चांगले मत व्यक्त केले, तर ५० टक्के विद्यार्थ्यांनी नाराजी व्यक्त केली. ऑनलाइन शिक्षणासाठी ९५ टक्के विद्यार्थ्यांनी मोबाईल साधनाचा उपयोग केला तर फक्त पाच टक्के विद्यार्थ्यांनी संगणक वापरला. ४० टक्के विद्यार्थ्यांना ऑनलाइन शिक्षणासाठी इंटरनेट कनेक्टिव्हिटीचा त्रास झाला, तर ६० टक्के विद्यार्थ्यांना कनेक्टिव्हिटी उत्तम प्रकारे प्राप्त झाली. ऑनलाइन परीक्षेसाठी विद्यापीठाने दिलेला वेळ योग्य आहे असे ८० टक्के विद्यार्थ्यांचे मत आहे, तर २० टक्के विद्यार्थ्यांनी वेळ वाढवून मिळावा, अशी अपेक्षा व्यक्त केली.
सर्वेक्षणासाठी पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष, संचालक, प्राचार्य यांचे मार्गदर्शन व सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे सहकार्य लाभले. पाचोरा सहकारी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष संजय वाघ, उपाध्यक्ष विलास जोशी, मानद सचिव ॲड. महेश देशमुख, प्राचार्य डॉ. एन. एन. गायकवाड यांनी प्राध्याकांचे कौतुक केले.
तासिकांबरोबर प्रात्यक्षिकेही
ऑनलाइन शिक्षण विद्यार्थ्यांनी तंत्रज्ञान चांगल्या प्रकारे आत्मसात केल्याचे जाणवले. तासिकांबरोबर विज्ञान शाखेच्या प्रात्यक्षिकांचे सादरीकरण झाले. तसेच विद्यार्थ्यांचे अंतर्गत मूल्यमापन याबाबत ९० टक्के विद्यार्थी समाधानी असल्याचे जाणवले
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.