मेहुणबारे (ता. चाळीसगाव) : वरखेडे (ता. चाळीसगाव) शेतशिवारात (Farm) बिबट्याने (Leopard) वारसावर हल्ला करून फडशा पाडला. ही घटना सोमवारी (ता. २१) उघडकीस आली. दरम्यान, गेल्या पंधरा दिवसांत तीन वेळा बिबट्याने जनावरांवर हल्ले (Attacks) केल्याने भीतीचे वातावरण आहे.(varkhade villege leopard attack farmer fear)
चार वर्षांपूर्वी वरखेडे (ता. चाळीसगाव) शिवारात नरभक्षक बिबट्याने सात जणांचा बळी घेतला होता. या नरभक्षक बिबट्याने धुमाकूळ घालत संपूर्ण जिल्ह्यातील यंत्रणा कामाला लावली होती. आता पुन्हा या भागातील उदेसिंग पवार सर्वोदय आश्रम शाळेपासून एक किलोमीटरवर असलेल्या एकनाथ शिरसाट यांच्या शेतात बिबट्याने वासरावर हल्ला करून फडशा पाडला. या हल्ल्यात वासराचे धड शरीरावेगळे केल्याने भीती पसरली आहे.
शेतकऱ्यांना मदत द्या
मात्र, ज्या ठिकाणी वासरांवर हल्ला झाला त्या ठिकाणी बिबट्याचे पायाचे ठसे देखील मिळून आले आहेत. वनरक्षक श्रीराम राजपूत यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी करून पंचनामा केला. वन विभागाने या शेतकऱ्याला तातडीने मदत द्यावी, अशी मागणी केली जात आहे.
पंधरा दिवसांत तीन हल्ले
वरखेडेसह पिलखोड परिसरात बिबट्याने पंधरा दिवसांत तीन हल्ले करून तीन वासरांचा फडशा, पाडला. या तीन घटनांमुळे ग्रामस्थांसह शेतकरी भयभीत झाले आहेत. वन विभागाने बिबट्याचा बंदोबस्त करावा, अशी मागणी होत आहे.
बिबट्याला पोषक वातावरण
यावर्षी शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर उसाची लागवड केली आहे. वरखेडे शिवार बिबट्याच्या अधिवासासाठी सुरक्षित जागा असल्याने एक बिबट्या गेल्यावर दुसरा बिबट्या लगेच येतो, असे तज्ज्ञांचे मत आहे. शिवाय ज्या भागात वासरांवर हल्ले झाले, तो भाग काही प्रमाणात जंगली असल्याने बिबट्याचे पुन्हा आगमन झाले आहे. या बिबट्याला जेरबंद करून वन विभागाने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना तातडीने भरपाई द्यावी, अशी मागणी होत आहे.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.