चोपडा : कोरोनामुळे (corona) सर्वच उद्योग-व्यवसायांची (Industry-business) वाट लागली असतानाही शेतीमालावर (Agriculture) आधारित चोपडा कृषी उत्पन्न बाजार समितीचा (Chopra Agricultural Produce Market Committee) व्यवहार तेजीत राहिला. शेतमालाची विक्रमी आवक आल्याने चोपडा बाजार समिती (Good business) मालामाल झाल्याने उत्पन्नात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. या आर्थिक वर्षात मक्याची विक्रमी खरेदी झाली असून, बाजार समितीला दोन कोटी आठ लाख रुपये उत्पन्न मिळाले असून, २८ लाखांचा विक्रमी नफा झाला आहे.
(corona crisis but chopda market committee income huge)
विशेष म्हणजे, कोरोना संकटात अनेक दिवस बाजार समिती बंद असूनही इतिहासात पहिल्यांदा सर्वांत जास्त उत्पन्न बाजार समितीला मिळाल्याची माहिती बाजार समितीचे सभापती कांतिलाल पाटील यांनी ‘सकाळ’ला दिली. उपसभापती नंदकिशोर पाटील, सचिव नीळकंठ सोनवणे उपस्थित होते. चोपडा बाजार समितीत सूर्यफूल, भुईमूग, सोयाबीन, ज्वारी, बाजरी, मका, दादर, गहू, हरभरा व इतर कडधान्यासह सर्वच मालाला या वर्षी चांगल्या प्रकारे भाव मिळाल्याने शेतकऱ्यांनी आपला माल बाजार समितीत मोजला. यामुळे शेतकऱ्यांना रोख स्वरूपासह धनादेशद्वारे तातडीने मोबदलाही देण्यात आल्याने व्यवहार चोख राहिला. यामुळे शेतकऱ्यांचा चोपडा बाजार समितीकडे शेतमाल विक्री करण्याचा कल दिसून आला. कोरोनाच्या शेतकरी, व्यापारी यांना तत्काळ बाजार समितीत येण्यास बंदी करण्यात आल्याने वेळीच संसर्ग रोखल्याने चोपडा बाजार समिती सुरक्षित राहिली. याबाबत संचालक मंडळाने योग्य ते नियोजन करून शेतकऱ्यांच्या मालाची खरेदी सुरू ठेवली.
विक्रमी उत्पन्न
२०२०-२१ या आर्थिक वर्षात सर्वत्र कोविड- १९ ने हाहाकार पसरल्याने प्रत्येक उद्योगधंद्याच्या उत्पन्नाला कात्री लागली असून, खर्चात वाढ झाली आहे. परंतु याला चोपडा बाजार समिती अपवाद ठरली असून, २०२०-२१ या आर्थिक वर्षात बाजार समितीला दोन कोटी आठ लाखांचे उत्पन्न मिळाले असून, २८ लाखांचा नफा झाला आहे. यात भुसार मार्केट फी (अडावद, गलंगी) एक कोटी ४० लाख, कापसाच्या ३८ दिवस चाललेल्या सीसीआय केंद्रातून एक लाख पाच हजार क्विंटल कापूस मोजला गेला. त्यापोटी शेकडा ५० पैसे प्रमाणे ३० लाख ३२ हजार मार्केट फी, तर ५ पैसे याप्रमाणे तीन लाख तीन हजार सुपरव्हिजन फी असे एकूण ३३ लाख ५० हजार रुपये मार्केटला मिळाले. मार्केट शॉपिंग सेंटर व गुदामभाडे २८ लाख, काटा फी २१ लाख असे एकूण दोन कोटी आठ लाखांचे विक्रमी उत्पन्न चोपडा बाजार समितीला मिळाले असून, २८ लाखांचा नफा झाला आहे. विशेष म्हणजे, खर्चातदेखील मोठी कपात करण्यात आली आहे.
जनावरांचा बाजार बंदच
चोपडा बाजार समितीत दर रविवारी भरणारा जनावरांचा बाजार कोरोनामुळे चार ते पाच महिन्यांपासून बंद आहे. येथील व्यवहार ठप्प असल्याने बाजार समितीचे जवळपास पाच लाखांचे नुकसान झाले आहे. दरम्यान, सामाजिक बांधिलकी म्हणून कोविड काळात बाजार समितीने सरकारला २५ हजारांची मदत दिली आहे.
चोपडा बाजार समितीत सर्वांत जास्त आवक (आकडे क्विंटलमध्ये)
- मका- १ लाख १० हजार ६३९
- कापूस- १ लाख ५ हजार
- बाजरी- ३१ हजार २२७
- ज्वारी-२४ हजार ४८९
- गहू- २३ हजार ३६३
- हरभरा- १७ हजार ३३६
- दादर- १५ हजार ८७७
कोरोना काळात शेतमालाची मोठी आवक बाजार समितीत आली. जळगाव, पारोळा, अमळनेर व बाहेरील जिल्ह्यांतून शेतकऱ्यांनी चोपडा बाजार समितीत हरभरा आणला होता. त्याला सर्वांत जास्त भावदेखील मार्केटकडून देण्यात आला. शेतमालाची आवक वाढल्याने चांगला नफा झाला आहे.
- कांतिलाल पाटील, सभापती, बाजार समिती, चोपडा
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.