गणपूर (ता चोपडा) : शासनाने कपाशीच्या लागवडीसाठी भलेही एक जून चा मुहूर्त शोधला असला तरी खानदेशात मे अखेर सुमारे पंधरा हजार एकर क्षेत्रावरील लागवड आटोपली असून मे मध्यानंतर लागवड झालेल्या बियाण्यात बीजांकुरण होऊन अंकुर डोलू लागले आहेत.
(cotton cultivation on fifteen thousand acres in khandesh)
पाण्याची सोय असलेल्या भागात चोपडा ,यावल,भुसावळ,शहादा ,तळोदा,साक्री,भडगाव, एरंडोल, धरणगाव भागात वीहिरी व कूप नलिकांच्या पाण्यावर तर काही क्षेत्रावर धरणाच्या पाण्यावर लागवड करण्यात आली आहे.
ठराविक वाणांना मागणी
कपाशी चे शंभराहून अधिक संकरित व बीटी वाण बाजारात असले तरी ठरावीक वाणांना मागणी आहे.मोक्षा ,राशी दोन ,राशी 659,मानिमेकर ,मॅजिक,निओ,मल्लिका,विठ्ठल आदी वाणांना अधिक मागणी असून काही गुजरात मधील वाणांची लागवडही करण्यात आली आहे.यावर्षी बियाण्याच्या पाकिटाची किंमत 750 ते 770 रुपये इतकी आहे.
बियाण्यातच रिफ्युजी....
बियाण्याचे पाकीट 475 ग्रॅमचे असून त्यातच दहा टक्के रिफ्युजी(नॉन बीटी)बियाणे मिश्रित करण्यात आले आहे.त्यामुळे शेतात विखुरलेल्या भागात ते राहील व त्यावर बोन्ड अळीचा प्रादुर्भाव होईल अशी ही संकल्पना आहे.
ठिबकचा वापर.....
काही भागात पाण्याची उपलब्धता कमी असल्याने शेतकऱ्यांनी ठिबक सिंचनाचा वापर करून बियाण्याची उगवण केली आहे. मे च्या मध्यात लागवड झालेले बियाण्याचे आठवड्यात अंकुरण झाले असून त्यातील नांग्या भरण्याचे कामही सुरू झाले आहे.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.