खानदेशात उन्हाळी कपाशी लागवड सुरू..!

गेल्या वर्षा पूर्वी नॉन बीटीच्या बीयाण्याचा पाऊच बॅग मध्ये टाकण्यात येत असे
खानदेशात उन्हाळी कपाशी लागवड सुरू..!
Updated on

गणपूर (ता चोपडा) : खानदेशात (Khandesh) मोठ्या क्षेत्रावर लागवड (Planting) होणाऱ्या संकरित कपाशी (cottan) च्या उन्हाळी(खरीप पूर्व) (Kharif East) लागवडीला सुरुवात झाली असून येत्या आठवड्यात ही लागवड वेग धरेल.त्यासाठी शेतात शेतकऱ्यांची कामाची लगबग सुरू असल्याची दिसत आहे.

(Khandesh cottan planting kharif east farmer farming work)

खानदेशातील जळगाव, धुळे,व नंदुरबार जिल्ह्यात कपाशीची मोठी लागवड होते. गेल्यावर्षी बाजारात नसलेले राशी दोन हे बियाणे या वर्षी बाजारात आल्याने ही लेट व्हरायटी असून मे अखेर व जून च्या पहिल्या आठवड्यात तिची लागवड होईल

खानदेशात उन्हाळी कपाशी लागवड सुरू..!
म्युकरमायकोसिसचे सर्वाधिक रुग्ण जळगाव जिल्ह्यात

अनेक वाण बाजारात...

यावर्षी अजित सिड्स चे काही वाण व राशी चे राशी दोन, राशी 659,मनीमेकर ,मल्लिका अश्या बिजी2 च्या बऱ्याच वाणांना मागणी आहे.सध्या विहिरी ट्युबवेल च्या पाण्यावर लागवड सुरू असून पुढील आठवड्यात काही भागात धरणाच्या पाण्यावरील लागवड सुरू होण्याची शक्यता आहे

भावात वाढ

गेल्या वर्षी 730 रुपये प्रतिबॅग असलेली किंमत यावर्षी 760 रुपये असून एका बॅग मध्ये 475 ग्रॅम बियाणे आहे. गेल्या वर्षा पूर्वी नॉन बीटीच्या बीयाण्याचा पाऊच बॅग मध्ये टाकण्यात येत असे त्याचा वापर शेतकरी करीत नसल्याने यावर्षी बियाण्यातच पाच टक्के नॉन बीटी (रिफ्युजी)मिक्स करण्यात आले आहे.

खानदेशात उन्हाळी कपाशी लागवड सुरू..!
वाट बघतोय रिक्षावाला..तीही शासनाच्या दीड हजाराची !

खानदेशात क्षेत्र वाढणार

खानदेशात यावर्षी कपाशीचे क्षेत्र वाढण्याची शक्यता असून ही लागवड 1 जुलै पर्यंत चालेल.संकरित ,बिजी 1,बिजी 2,वाय वन आदी वाण यावर्षी लागवड होतील खानदेशात सुमारे सहा ते साडे सहा लाख हेक्टर क्षेत्रावर यावर्षी कपाशी लागवडीची शक्यता आहे गणपूर (ता चोपडा)शिवारात सुरू झालेली कपाशीच्या बिजी दोन वाणांची लागवड

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.