चोपडा उपजिल्हा रुग्णालयातील ऑक्सिजन प्रकल्पाने लाखो रुपयांची बचत

विजपुरवठा खंडित झाल्यास प्रकल्प जनरेटरवर चालवता येणार आहे. त्यामुळे गरजेच्या काळात अत्यवस्थ रुग्णांना दिलासा मिळणार
चोपडा उपजिल्हा रुग्णालयातील ऑक्सिजन प्रकल्पाने लाखो रुपयांची बचत
Updated on



चोपडा : येथील उपजिल्हा रुग्णालयात (Sub-District Hospital) लोकसहभागातून (public participation) कार्यरत ऑक्सिजन निर्मिती प्रकल्पाची (Oxygen production project) तीन दिवस चाचणी घेतल्यानंतर रुग्णांना नियमित प्राणवायू देण्याचे मदतकार्य शुक्रवार (ता. १४)पासून सुरू करण्यात आले. यावेळी यंत्रांचे पूजन अधीक्षक डॉ. मनोज पाटील, डॉ. गुरुप्रसाद वाघ, डॉ. नरेंद्र पाटील, नायब तहसीलदार राजेश पऊळ यांनी केले. यावेळी न्यायाधीश गणेश लांडबले, सरकारी वकील वैशाली निरगुडे यांच्यासोबत एस. बी. पाटील, कुलदीप पाटील उपस्थित होते. (oxygen project chopra sub district hospital saves millions rupees)

चोपडा उपजिल्हा रुग्णालयातील ऑक्सिजन प्रकल्पाने लाखो रुपयांची बचत
रुग्णांचा जीव टांगणीला अन्‌ म्हणे ‘ट्रायल’ घेत होते..!

या प्रकल्पातून रुग्णांना नियमित एक लाख २५ हजार लीटर ऑक्सिजन प्रतिदिन देण्यात येईल. विजेचा खर्च काढून महिन्याकाठी किमान एक लाख तर सध्याच्या ऑक्सिजन तुटवड्याच्या काळात उपजिल्हा रुग्णालयाची महिन्याला किमान चार लाख रुपयांची बचत होणार आहे. सगळ्यात महत्वाचे म्हणजे ऑक्सिजन सिलिंडर भरून न आल्याच्या कारणास्तव कुणाचेही प्राण जाणार नाहीत, असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे. या प्रकल्पासाठी एकूण १२ लाख रुपये खर्च अपेक्षित असून आतापर्यंत १० लाख ६७ हजार जमा झाले आहेत. अजूनही दानशूर लोक देणगी पाठवीत आहेत.

असा आहे प्रकल्प

प्रकल्पासाठी लोकसहभागातून १० लाख ६७ हजार रुपयांचा निधी गोळा झाला असून अजून निधी जमा करण्यात येत आहे. यापूर्वी या पूर्वीही लोकसहभागातून दोन ड्युरा सिलिंडर टॅंकही लोकसहभागातून देण्यात आले आहे. पुन्हा हा १२ लाख रुपयांचा प्रकल्प हाती घेत तो पूर्ण होण्याचा मार्गावर आहे. या ऑक्सिजन प्रकल्पाची उभारणी झाल्यानंतर रुग्णालयातील २० बेडला सुविधा मिळणार आहे. सव्वालाख लीटर ऑक्सिजन तयार होणार असून १८ सिलिंडर प्रती दिवस क्षमता असली तरी पूर्ण प्रेशरने तो मिळत असल्याने सध्याच्या वापरातील २१ जंबो सिलिंडरची गरज त्याने भागणार आहे. तसेच विजपुरवठा खंडित झाल्यास प्रकल्प जनरेटरवर चालवता येणार आहे. त्यामुळे गरजेच्या काळात अत्यवस्थ रुग्णांना दिलासा मिळणार आहे.

चोपडा उपजिल्हा रुग्णालयातील ऑक्सिजन प्रकल्पाने लाखो रुपयांची बचत
लवाद प्रत्येकवेळी जळगाव महापालिकेच्या हिताच्या मुळावर !

दातृत्वाचे कौतुक

देणाऱ्याने देत जावे..घेणाऱ्याने घेत जावे..! या उक्तीप्रमाणे तालुकावासीयांनी भरभरून लाखो रुपयांचा निधी गोळा करून प्रकल्प उभारणी केली आहे. या दातृत्वाचे सोशल मीडियावर अनेकांनी कौतुकाचा वर्षाव केला. देशात तिसऱ्या लाटेची शक्यता वर्तविली जात आहे. या अनुषंगाने ज्या गावात प्राथमिक आरोग्य केंद्र आहे तेथे जर दहा बेड ऑक्सिजनचे व दहा साध्या बेडची तरतूद केल्यास तालुक्यात एकूण दीडशे बेड उपलब्ध होऊ शकतात. यावर लासूर व हातेड आरोग्य केंद्रात दहा बेड ऑक्सिजनचे करण्याचे काम सोमवारी (ता. १७) सुरू होणार आहे. यासाठी एका केंद्राचा खर्च साधारणपणे दीड लाख रुपयांपर्यंत जाईल. लासूर, हातेड, चहार्डी, गोरगावले, अडावद, धानोरा, वैजापूर येथील तरुणांनी पुढाकार घेऊन लोकसहभागातून निधी गोळा करून प्राथमिक आरोग्य केंद्रात सुविधा उपलब्ध कराव्यात असे आवाहन एस. बी. पाटील यांनी केले आहे.

(oxygen project chopra sub district hospital saves millions rupees))

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()