जळगाव जिल्हा दुष्काळग्रस्त जाहीर करा; भाजपची मागणी

Jalgaon News: जिल्ह्यात सर्वत्र पावसाने दडी मारल्यामुळे आगामी काळात पिण्याच्या पाण्याची तसेच जनावरांच्या चाऱ्याची गंभीर समस्या निर्माण होण्याची भीती आहे.
drought
drought
Updated on


एरंडोल : संपूर्ण जिल्ह्यात यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस (Rain) पडला असून खरीप पिकांची वाढ खुंटल्यामुळे शेतकरी (Farmer) चिंताग्रस्त झाले आहेत. शासनाने (Stat Government) याबाबत त्वरित दखल घेवून जिल्हा दुष्काळग्रस्त जाहीर करून (District drought declared ) शेतकऱ्यांना मदत जाहीर करावी अशी मागणी भाजपतर्फे तहसीलदार सुचिता चव्हाण यांना दिल्लेल्या निवेदनात केली आहे.

drought
डोलारखेडा जंगलातील पट्टेदार वाघ सुदृढ- डिएफओ होसींग


भाजपतर्फे देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे, की जिल्ह्यात १५ ऑगस्ट पर्यंत सरासरी पावसाच्या केवळ पंचवीस टक्के पाउस झाल्यामुळे खरिपाची पेरणी पूर्णपणे वाया गेली आहे. पेरणी वाया गेल्यामुळे शेतकऱ्यांसमोर आर्थिक संकट उभे राहिले आहे. तसेच जामने, अमळनेर, पाचोरा, धरणगाव, भडगाव या तालुक्यात पंचवीस टक्क्यांपेक्षाही कमी पाउस झाला आहे. जिल्ह्यात सर्वत्र पावसाने दडी मारल्यामुळे आगामी काळात पिण्याच्या पाण्याची तसेच जनावरांच्या चाऱ्याची गंभीर समस्या निर्माण होण्याची भीती आहे.

bjp workers statemen
bjp workers statemen

कुत्रिम पाऊस पाडावा..

शासनाने पिण्याच्या पाण्याची आणि गुरांच्या चाऱ्याची समस्या सोडविण्यासाठी कृत्रिम पाऊस पाडण्याचे नियोजन करावे अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे. पिण्याच्या पाण्याची समस्या निर्माण होणाऱ्या गावांचा त्वरित सर्व्हे करून उपाययोजना करण्यात याव्यात, शेतकऱ्यांना तातडीने मदत करावी, जिल्हा दुष्काळग्रस्त म्हणून जाहीर करण्यात यावा आदी मागण्या निवेदनातून केल्या आहेत. याबाबत शासनाने त्वरित निर्णय न घेतल्यास भाजपतर्फे आंदोलन केले जाईल असा ईशारा देखील दिला आहे.

drought
ओटीपी शेअर न करताही ऑनलाईन गंडा? बँकांसह ग्राहकांनाही धक्का

निवेदन देतांना यांची होती उपस्थितीत

यावेळी नगराध्यक्ष रमेश परदेशी,माजी नगराध्यक्ष रवींद्र महाजन,भाजप ओ.बी.सी.मोर्चाचे माजी जिल्हाध्यक्ष अशोक चौधरी,तालुका सरचिटणीस अमोल जाधव,राजेंद्र पाटील,नगरसेवक नितीन महाजन,माजी नगरसेवक नरेंद्र पाटील,सुनील पाटील,सानाजय साळी,भाजप युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष प्रशांत महाजन,वाल्मिक सोनावणे,अनिल महाजन,अकिल शेख,धनराज पाटील,युवराज देशमुख,कल्पेश पाटील,उद्योग आघाडीचे जिल्हाध्यक्ष सचिन विसपुते,लोकेश महाले,नंदलाल सोनार, प्रदीप महाजन,शुभम पाटील,अजित पाटील,रवींद्र पाटील यांचेसह पदाधिकारी उपस्थित होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()