ग्रामपंचात निवडणुक रणधुमाळी: जळगाव जिल्ह्यात आजपासून अर्ज भरण्याच प्रक्रिया 

ग्रामपंचात निवडणुक रणधुमाळी: जळगाव जिल्ह्यात आजपासून अर्ज भरण्याच प्रक्रिया 
Updated on

जळगाव ः  जळगाव जिल्ह्यातील ७८३ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणूकीची रणधुमाळी उदयापासून (ता.२३) सुरू होत आहे. निवडणूक प्रक्रियेसाठी जिल्ह्यातील सर्व तालुका प्रशासन सज्ज झाले आहे. उद्यापासून अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू होणार आहे. 

जिल्ह्यातील ७८३ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठी १५ जानेवारीस मतदान होणार आहे. निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना आज प्रशिक्षण देवून अर्ज कसे घ्यावयाचे, कोणती कागदपत्रे पहावयाची आदीची माहिती देण्यात आली. निवडणूक प्रक्रियेसाठी तहसील कार्यालयात टेबलाची आज मांडणी करण्यात आली. तब्बल टेबलांवर निवडणूकीचे अर्ज ग्रामपंचायत निहाय स्वीकारले जातील. जळगावला तहसीलदार नामदेव पाटील, निवासी नायब तहसीलदार दिलीप बारी यांच्या देखरेखीखाली निवडणूक कर्मचारी, अधिकारी कार्यरत आहेत. 

अर्ज भरताना १६ कागदपत्रे गरजेची…. 
निवडणूक अर्ज ऑनलाइन भरावा लागेल. त्याची प्रिंट काढून तहसील कार्यालयात द्यावी लागतील. मतदार यादीत उमेदवाराचे नाव ज्या पानावर आहे त्या पानाची सत्यप्रत, अनामत रक्कमेची पावती (राखीवसाठी १०० रूपये, सर्वसाधारणसाठी ५०० रूपये), राष्ट्रीयकृत बँकेत खाते उघडून त्याची छायांकित प्रत, मालमत्ता, दायीत्व घोषणापत्र, हयात अपत्ये दोन पेक्षा अधिक नसल्याबाबत उमेदवारांचे स्वघोषणापत्र, जात प्रमाणपत्र, रोजचा खर्च सादर करण्याबाबत हमीपत्र, उमेदवाराचे वय २१ वर्ष पूर्ण असल्याबाबत प्रमाणपत्र, आधारकार्डाची झेरॉकस, थकबाकीदार नसल्याचे प्रमाणपत्र, ग्रामपंचायत ठेकेदार नसल्याचे प्रमाणपत्र, शौचालय असल्याचे प्रमाणपत्र, शौचालय वापरत असल्याबाबत ग्रामसभेतील ठराव मंजूरीची प्रत.

जळगाव तालुक्यात ४३ ग्रामंपचातीच्या निवडणुका 

जळगाव तालुक्यात ४३ ग्रामपंचायतींच्या निवडणुका होणार आहेत. त्यात शिरसोली प्रबो, शिरसोली प्र.न., नशिराबाद, जळगाव खुर्द, कुसुंबा, चिंचोली, रायपूर, कंडारी, असोदा, आव्हाणे, ममुराबाद, फुफनगरी, रामदेववाडी, तरसोद, मन्यारखेडे, उमाळा, वडनगरी, भादली बुद्रुक, कडगाव, भोकर, कठोरा, आवार, सावखेडा बुद्रुक, लमांजन प्रबो, रिधूर, आवार, शेळगाव, म्हसावद, वडली, मोहाडी, वावडदे, जवखेडे आदींचा समावेश आहे. 


निवडणूक कार्यक्रम 
अर्ज दाखल करणे ः २३ ते ३० डिसेंबर 
छाननी ः ३१ डिसेंबर 
अर्ज माघारी, चिन्हवाटप ः ४ जानेवारी २०२१ 
मतदान ः १५ जानेवारी 
मतमोजणी ः १८ जानेवारी 
 

संपादन- भूषण श्रीखंडे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.