खानदेशात ॲलर्ट;अहमदनगर जिल्ह्यातून येणार कोरोनाची तिसरी लाट

एकीकडे कोरोनाच्या संभाव्य लाटेबाबत सूचना येत असताना जळगाव जिल्ह्याच्या दृष्टीने दिलासादायक स्थिती कायम आहे.
corona
corona
Updated on



जळगाव :
अहमदनगर जिल्ह्यात दररोज पाचशेवर (Corona) नवे रुग्ण आढळून येत असल्याने उत्तर महाराष्ट्रातील अन्य जिल्ह्यांची चिंता वाढली आहे. त्यामुळे कोरोनासंबंधी नियमांची कठोर अंमलबजावणी करावी, अशा सूचना राज्य नियोजन मंडळाचे (State Planning Board) कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी केल्या.

corona
गोळीबाराने जळगाव पुन्हा हादरले..कांचननगर परिसरात घडली घटना


नाशिक महसूल विभागातील नाशिक, अहमदनगर, धुळे, जळगाव आणि नंदुरबार या पाच जिल्ह्यांतील जिल्हा नियोजन समितींतर्गत जिल्हा वार्षिक योजनेच्या माध्यमातून करण्यात आलेल्या कामांची आढावा बैठक श्री. क्षीरसागर यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली, त्या वेळी ते बोलत होते. जळगाव जिल्ह्यातून या बैठकीस अपर जिल्हाधिकारी प्रवीण महाजन, जिल्हा परिषदेचे कार्यकारी अधिकारी पंकज आशिया, जिल्हा आरोग्याधिकारी डॉ. जमादार, महापालिका उपायुक्त श्‍याम गोसावी आदी उपस्थित होते.

corona
एमपीडीए कारवाईपूर्वीच अट्टल गुन्हेगार पोलिस स्टेशनमधून पळाला


बालकांसाठी व्यवस्था करा
संभाव्य तिसऱ्या लाटेत बालकांना धोका असल्याची शक्यता वर्तविली जात आहे. त्याअनुषंगाने बालकांसाठी आयसीयू बेड, व्हेंटिलेटर, ऑक्सिजन व इतर आवश्यक बाबींची व्यवस्था करावी. प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी तीनपट ऑक्सिजनची व्यवस्था करण्याची सूचनाही त्यांनी केली.
अहमदनगर जिल्ह्यातील कोरोना रुग्णसंख्येची वाढ रोखण्यासाठी नियमांची कडक अंमलबजावणी करण्यात यावी, असेही श्री. क्षीरसागर यांनी या वेळी सांगितले.

ठाकरेंच्या नावे उद्याने
बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाने प्रत्येक जिल्ह्यात उद्यान स्मारक उभे करून यामध्ये ज्येष्ठ नागरिकांसाठी विरंगुळा केंद्राची उभारणी, व्यंग्यचित्र केंद्र, ओपन जिम, कलादालन, जिल्ह्यातील प्रसिद्ध खाद्यपदार्थांचे स्टॉल अशा सर्वसमावेशक बाबींचा त्या उद्यान स्मारकात समावेश करण्याबाबत त्यांनी सूचना केल्या.

corona
खर्चाअभावी धुळे जिल्हा राज्यात शेवटच्या क्रमांकावर

जिल्ह्यात शून्य रुग्ण दिवस
एकीकडे कोरोनाच्या संभाव्य लाटेबाबत सूचना येत असताना जळगाव जिल्ह्याच्या दृष्टीने दिलासादायक स्थिती कायम आहे. दुसऱ्या लाटेची तीव्रता ओसरल्यानंतर सातत्याने शून्य रुग्णांची नोंद होत आहे. बुधवारी प्राप्त एक हजार ९७९ चाचण्यांच्या अहवालातून एकही रुग्ण समोर आला नाही, तर एक रुग्ण दिवसभरात बरा झाला. त्यामुळे जिल्ह्यातील सक्रिय रुग्णांची संख्या प्रथमच दहाच्या आत म्हणजे नऊवर आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.