खानदेशचा दौरा आपण केलाय, या संपूर्ण भागात सरासरीइतकाही पाऊस झालेला नसून दुष्काळसदृश स्थिती आहे.
जळगाव : राज्यातील ठाकरे सरकारने (Thackeray government) माणसं जगविण्यासाठी काहीच प्रयत्न केल्याचे दिसत नाही.. माणसं जगविणारं नव्हे तर केवळ मृत्युचे आकडे जाहीर करणारं हे सरकार आहे, अशी टीका भाजपनेते आमदार आशिष शेलार (MLA Ashish Shelar) यांनी केली. प्रदेशाध्यक्ष राज ठाकरेंना (Raj Thackeray) भेटले असले तरी भाजप मनसेशी युती करणार नाहीच, असे सांगत त्यांनी त्या चर्चेला पूर्णविराम दिला.
पक्षसंघटन व दुष्काळी स्थिती आढावा घेण्यासाठी खानदेशच्या दौऱ्यावर असलेल्या शेलार यांनी आज जळगावात पक्षाची बैठक घेतली, त्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.
या वेळी आमदार तथा जिल्हाध्यक्ष सुरेश (राजूमामा) भोळे, भुसावळचे आमदार संजय सावकारे, जि.प. अध्यक्षा रंजना पाटील, महानगर जिल्हाध्यक्ष दीपक सूर्यवंशी, माजी जि.प. उपाध्यक्ष नंदू महाजन, डॉ. राधेश्याम चौधरी, विशाल त्रिपाठी आदी उपस्थित होते.
खानदेशात दुष्काळसदृष स्थिती
राज्यात सत्तेत असलेल्या सरकारची जनतेप्रत संवेदनशीलता नाही. कोविड व नैसर्गिक अपत्तीच्या स्थितीत लोकांना जगविण्यापेक्षा केवळ मृतांचे आकडे जाहीर करण्याचं काम या सरकारने केले असून त्यातही लपवाछपवी सुरु आहे. खानदेशचा दौरा आपण केलाय, या संपूर्ण भागात सरासरीइतकाही पाऊस झालेला नसून दुष्काळसदृश स्थिती आहे. त्यासंबंधी अहवाल विरोधी पक्षनेते फडणवीस यांना सादर करुन मुख्यमंत्र्यांशी चर्चा करु, असे ते म्हणाले.
मलिक यांनी अभ्यास करावा
राज्यपाल सरकारच्या अधिकारावर गदा आणत असल्याच्या नवाब मलिक यांच्या आरोपाबाबत बोलताना शेलार म्हणाले, मलिक केवळ त्यांच्या मालकाने लिहून दिलेली स्क्रीप्ट वाचून दाखवितात. राज्यपालांच्या दौऱ्याचा त्यांनी अभ्यास केला असता तर हे बोलायची वेळ आली नसती.
.. तर अदानींवर कारवाई करा
मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज विमानतळ हस्तांतराचा ठराव राज्य सरकारने करुन दिला. त्यात नाव बदलू नये अथवा अन्य अटी-शती घातल्या होत्या का? दिवसा वेगळे करायचे आणि ज्यांच्या विरोधात बोलतोय, आंदोलन करतोय त्यांच्याकडून टक्केवारी ठरवायची, असे धंदे सुरु आहेत. अदानी समूहाने नियमबाह्य काही केले असेल तर राज्य सरकारने त्यांच्यावर कारवाईची हिंमत दाखवावी, असे आव्हान शेलार यांनी दिले.
शब्द फिरविणारे मुख्यमंत्री
शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या मुद्यावर बोलताना शेलार म्हणाले, ठाकरे सरकारने कर्जमाफीपेक्षा कर्जमुक्तीची घोषणा केली होती. सातबारा कोरा करु, असे त्यांचे शब्द होते. परंतु, शब्द व घोषणा फिरविणारे मुख्यमंत्री महाराष्ट्र सध्या अनुभवतोय..
खडसेंवर ही टिका..
पत्रकार परिषदेत आमदार शेलार यांनी एकनाथराव खडसे यांचा बाबत विचारले असता, यावर बोलतांना ते म्हणाले, की हा विषयी जुना झाला आहे. त्यांबाबत बोलणार नाही ज्यांनी भाजप सोडला त्यांची दुर्गतीच झाली आहे. चुकीच्या कामे करणाऱ्यामागे इडी लागते असे सांगून आमदार आशिष शेलार यांनी खडसे यांना अप्रत्यक्ष टोला लगावला आहे.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.