जळगाव : गल्लीबोळापासून ते प्रमुख रस्ते अमृत योजनेसाठी खोदून (Bad road) टाकले आहेत. रस्त्यांचे भांडवल करत आमदार निवडून आले तरी रस्त्यांचे भाग्य उजळले नाही, रस्त्यांमुळे अनेकांना कंबर, पाठ, मानेचे आजार (Illness) जडले. आता आमच्या किडन्या विका आणि त्यातून शहराचे रस्ते तयार करा, असे निवेदन माहिती अधिकार कार्यकर्ते दीपक गुप्ता यांच्यासह नागरिकांनी जिल्हाधिकारी अभिजित राऊत (District Collector Abhijit Raut) आणि महापालिका आयुक्तांना (Municipal Commissioner) दिले आहे.
जळगाव शहराच्या रस्त्यांचा विषय गेल्या दोन वर्षांपासून ऐरणीवर आहे. निवेदने देऊन, आंदोलने करून केवळ आश्वासनेच पदरी पडत असल्याने दीपक गुप्ता, शिवलाल पाटील यांच्यासह बारा नागरिकांच्या स्वाक्षऱ्या असलेले निवेदन तयार करण्यात आले. निवेदनात नमूद केल्याप्रमाणे, जिल्हा प्रशासन महापालिकेने आमच्या किडन्या विकाव्यात त्यातून जो निधी उपलब्ध होईल, त्यातून जळगावचे रस्ते तयार करावेत, अशी मागणी केली आहे.
शिवाजीनगर हुडको भागात २० वर्षांपूर्वी घरे बांधून लाभार्थ्यांना देण्यात आली परंतु या भागातही रस्ते नाहीत. दुसरीकडे महापालिकेला शंभर कोटींपैकी ४२ कोटी देऊनही महापालिकेने दिलेल्या कामांकडे दुर्लक्ष केले जाते. अमृत योजना आणि भुयारी गटारींसाठी गल्लीपासून मुख्य रस्त्यांचे खोदकाम करण्यात आले. ठेकेदारांनी खोदलेले रस्ते मात्र, बुजवलेच नाहीत. त्यातूनच पावसाळ्यादरम्यान परिस्थिती चिघळली. महापालिका आयुक्त सतीश कुलकर्णी यांना वारंवार निवेदने देऊनही उपयोग होत नाही. या वेळी परिमल पटेल, मतीन पटेल, चैतन्य कोल्हे, मंदार कोल्हे, संजय पाटील, सिद्धार्थ सोनाळकर, अमोल कोल्हे, अनिल नाटेकर, सुरेश पांडे, शिवराम पाटील, किरण ठाकूर, ललित शर्मा, युसूफ पिंजारी अशा बारा नागरिकांच्या स्वाक्षऱ्या असलेल निवेदन आणि किडनीचे प्रातिनिधिक चित्र जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी स्वीकारले.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.