जळगाव : राज्यभरात गाजत असलेल्या बीएचआर पतसंस्थेतील (BHR Credit Union) कथित कोटयवधी रूपयांच्या ग़ैरव्यवहार (Scam) प्रकरणात आज पुणे आर्थिक गुन्हे शाखेच्या (Pune Economic Crime Branch) पथकाने सकाळी जळगावातील बड़या व्यावसायिकांसह (Businessman) जामनेरातील राजकीय व्यक्ति (Political person) अशा 11 जणांना ताब्यात घेतले. या कारवाईमुळे राजकीय व व्यवसायिक वर्तुळात खळबळ उडाली आहे. (bhr credit union scam case politicians businessmen arrested)
मल्टीस्टेट भाईचंद हिराचंद रायसोनी या पतसंस्थेत अवसायक नियुक्तीनंतर मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार झाल्याचा आरोप आहे. पुणे आर्थिक गुन्हे शाखेत दाखल या गुह्यात आधीच अनेकांना अटक झाली आहे.
सकाळी कारवाई
यात आर्थिक गुन्हे शाखेने आज सकाळी जळगाव शहरातील व्यवसायिक व काही राजकीय वरदहस्त लाभलेल्या व्यक्तिना ताब्यात घेतले.
यांना घेतले ताब्यात
जळगाव शहरातून व्यवसायिक भागवत भंगाळे , पाळधी येथुन जयश्री मणियार, संजय तोतला तर भुसावळ येथील आसिफ मुन्ना तेली , जामनेर येथील जितेंद्र रमेश पाटील, छगन शामराव झाल्टे, राजेश शांतीलाल लोढा तर मुंबई व औरंगाबाद येथून प्रत्येकी 1 व पुण्यातून जळगावचे प्रसिद्ध डाळ उद्योजक प्रेम नारायण कोगटा अशा 11 जणांना ताब्यात घेण्यात आले आहे.
पुण्याला नेणार
जळगावातून ज्यांना ताब्यात घेतले त्यांना जिल्हा पेठ पोलिस ठाण्यात नेले, तिथून त्यांना वैद्यकीय तपासणीसाठी सामान्य रुग्णालयात नेऊन मग पुणे येथे रवाना करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.
भागवत भंगाळेंना घेतले ताब्यात
भागवत भंगाळे यांना ताब्यात घेतल्याचे समजताच आमदार राजुमामा भोळे जिल्हा पेठ पोलिस ठाण्यात पोचले व त्यांनी त्यांची विचारपुस केल्याचे समजते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.