जळगाव : बीएचआर पतसंस्थेतील गैरव्यवहार (BHR Credit Union Scam) प्रकरणातील मुख्य संशयित (main suspect) सुनील झंवरने आमदार मंगेश चव्हाण (MLA Mangesh Chavan) यांच्यासोबत आपले आर्थिक संबंध असल्याचे मान्य केल्याची माहिती शुक्रवारी न्यायालयात सादर करण्यात आलेल्या रिमांड नोटमधून समोर आली. दुसरीकडे झंवरने चौकशीत काही गोष्टी मान्य केल्या असून, अनेक गोष्टी नाकारल्या आहेत. दरम्यान, पोलिस कोठडीची मुदत संपल्याने त्याला न्यायालयात (Court) उपस्थित केले असता, पोलिस कोठडीत २३ ऑगस्टपर्यंत वाढ झाली आहे.
झंवरला पुणे आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने गेल्या १० ऑगस्टला नाशिकमध्ये सापळा रचून अटक केली होती. कोठडीत असूनदेखील झंवरने पोलिसांना तपासात योग्य माहिती देण्याऐवजी उडवाउडवीची उत्तरे दिल्याचे समजते. परंतु याचबरोबर त्याने आमदार चव्हाण यांच्यासोबत आपले आर्थिक संबंध असल्याचे मान्य केल्याचेही आज स्पष्ट झाले. विशेष सरकारी वकील प्रवीण चव्हाण यांनीदेखील आज झंवरला पोलिस कोठडी वाढवून मिळावी म्हणून केलेल्या युक्तिवादात याबाबत न्यायालयात माहिती दिली.
आमदार चव्हाणांकडून मात्र नकार
दुसरीकडे, बीएचआर घोटाळ्याशी माझा किंवा माझ्या परिवारातील कोणत्याही सदस्याचा संबंध नाही. पावत्या मॅचिंग, मालमत्ता खरेदी किंवा सुनील झंवर यांच्याशीही माझा किंवा माझ्या कंपनीचा संबंध नाही. असे चाळीसगावचे आमदार चव्हाण यांनी जळगावमध्ये पत्रकार परिषदेत सांगितले होते. एवढेच नव्हे, तर राजकीय षड्यंत्रातून आपल्याला अडकविण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप देखील आमदार चव्हाण यांनी केला होता.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.