‘फोरवे’ झाला खरा पण महिनाभरात दहा जणांचा मृत्यू

‘फोरवे’ झाला खरा पण महिनाभरात दहा जणांचा मृत्यू; असुविधांमुळे अपघातांची मालिका सुरूच
jalgaon bhusawal highway
jalgaon bhusawal highway
Updated on

भुसावळ (जळगाव) : शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम अंतिम टप्प्यात सुरू आहे. मात्र, या महामार्गावर ठिकठिकाणी खडी पडलेली आहे, तर बहुतांश ठिकाणी खड्डे खोदण्यात आले आहेत. अशा अनेक असुविधांचा सामना वाहनधारकांना करावा लागत आहे. त्यामुळे महामार्गावर अपघातांचे प्रमाण सध्या वाढत आहे. तालुक्यातून जाणाऱ्या या महामार्गावर आतापर्यंत जवळपास दहा जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. (jalgaon-bhusawal-highway-fourway-but-last-month-accident-and-ten-death-case)

तालुक्यातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गाची रुंदी व वाहतुकीची वाढती संख्या लक्षात घेता, जुन्या महामार्गाचे चौपदरीकरणात रुपांतर करण्यात येत आहे. नॅशनल हायवे ॲथॉरिटी ऑफ इंडिया (न्हायी)अंतर्गत मागील अनेक वर्षांपासून महामार्गाच्या विस्तारीकरणाचा प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. या महामार्गाच्या कामाला मागील दीड ते दोन वर्षांपासून कामाला सुरवात करण्यात आली आहे. महामार्गाचे काम अंतिम टप्प्यात असल्यामुळे सदरचा महामार्ग वाहतुकीसाठी खुला आहे. या महार्गावर संबंधित ठेकेदार व प्रशासनाच्या वतीने सुविधा पूर्ण न करताच वाहतुकीसाठी महामार्ग खुला करण्यात आला असल्यामुळे रस्त्याची पूर्ण माहिती नसल्यामुळे व महामार्गावर याबाबत आवश्यक त्या ठिकाणी प्राथमिक सूचना फलक नसल्यामुळे वाहनधारकांची तारांबळ उडत असल्यामुळे अपघातांच्या संख्येत वाढ होत आहे.

jalgaon bhusawal highway
नानासाहेब, स्वबळावर लढायला ‘बळ’ कोठून आणणार?

महामार्गावर आतापर्यंत झालेले अपघात

तालुक्यातून जाणाऱ्या या महामार्गावर महिनाभरापासून अपघातांची मालिका सुरूच आहे. त्यात आतापर्यंत जवळपास महामार्गावरील असुविधांमुळे दहा जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. रविवारी (ता. २०) शहरातून जाणाऱ्या महामार्गावर माळी भवनाजवळ झालेल्या अपघातात दोन रेल्वे कर्मचारी असलेल्या युवकांना जीव गमवावा लागला आहे. तसेच गुरुवारी तालुक्यातील साकेगावजवळ शहरातील दर्डा कुटुंबातील दोन भावंडाचा, तसेच या ठिकाणी अवजड वाहनाने धडक दिल्याने एका युवकाचा मृत्यू झाला होता. तसेच तालुक्यातील फुलगाव फाट्याजवळ महामार्गाचे काम प्रगतिपथावर असल्यामुळे रस्त्याचा अंदाज न आल्यामुळ दुचाकीस्वार तिघांचा मृत्यू झाला होता. त्यापूर्वी महामार्गावर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा महामार्गावरच पाण्यात बुडून, तर मध्य प्रदेशातून गुजरातकडे जाणाऱ्या वाहनाला रस्त्याचा अंदाज न आल्यामुळे झालेल्या अपघातात चालकाचा जीव गेला होता. अशा प्रकारे महिनाभरात दहा जणांचे महामार्गावर प्राण गेले आहेत.

पथदीप सुरू करण्याची आवश्यकता

विस्तारीरित महामार्गामुळे जुन्या महामार्गावरून धावणाऱ्या अवजड वाहनांची संख्या कमी झाली आहे. मात्र रात्रीच्या वेळी विस्तारित महामार्गावर मोठ्या प्रमाणात वाहनांची वर्दळ असते. अशा वेळेस महामार्गावरील पथदीप सुरू असणे आवश्यक आहे. मात्र, संबंधित विभागाकडून संपूर्ण महामार्गावरील ठिकठिकाणचे पथदीप बंद असल्यामुळे वाहनधारकांना रस्त्याचा अंदाज येणे शक्य नसल्यामुळे अपघातांच्या संख्येत वाढ होत आहे. याकडे स्थानिक लोकप्रतिनिधींसह न्हायीच्या अधिकारी व ठेकेदारांनी लक्ष घालण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे. अन्यथा अशा प्रकरे अनेकांना आपला जीव गमवावा लागेल, यात शंका नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.