जळगावः चाळीसगाव परिसराव पून्हा आभाळ फाटले असून ३० व ३१ आॅगस्ट रोजी आलेल्या पुराच्या कटू आठवणी पून्हा आठव्या दिवशी जागा झाल्या आहे. पुन्हा ढगफुटी सदृष्य पाऊस (Heavy Rain) झाल्याने चाळिसगाव मधील सर्व लघू प्रकल्प (Dam Overflow) ओसंडून वाहत आहे. त्यामुळे गिरणा नदी व इतर नद्या दुथडी (Flood) भरून वाहूत आहे. यापूर्वीच ओव्हरफ्लो झालेल्या मन्याड धरण परिसरात पुन्हा ७ रोजीच्या मध्यरात्री आणि ८ रोजीच्या पहिल्या प्रहरी ढगफुटी सदृष्य पाऊस झाल्याने धरणातून सद्यस्थिती एक लाख क्युसेस पाण्याचा (Flood Alert) विसर्ग सुरु आहे.
चाळीसगाव तालुक्यात अतिवृष्टीने खरीप पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या डोळ्यातूनही आता पुरच वाहतो आहे. परंतू पुरा बाबत प्रशासन पूर्ण अर्लट असून प्रांताधिकारी, तहसीलदार यांनी रात्र जागून काढावी लागली. रात्री एकला पालिकेचा भोंगा वाजवून नागरिकांना केले सतर्क करण्यात आले. तर आज सकाळी 8 वाजेपर्यंत शहरातील नव्या व जुन्या पुलावरून पाणी वाहणे सुरूच असल्याने चाळीसगावचा दोन्ही कडचा संपर्क तुटलेला होता.
मंगळवारी धो धो बरसला..
मंगळवारी दिवसभर पाऊस धो..धो बरसला त्यामुळे डोंगरी व तितूर नदीपात्र दुथडी भरुन वाहत आहे. बुधवारी पहिल्या प्रहरी पाणी पातळी उंचावल्याने पुन्हा पूर सदृष्य स्थिती निर्माण झाली होती. सद्यस्थितीत पाणी ओसारायला काही अंशी सुरुवात झाली आहे.
मन्याड धरण ओव्हर फ्लो..
मन्याड धरणाच्या परिक्षेत्रात ढगफुटी सदृश्य पाऊस झाल्याने जवळपास एक लाख क्यूसेक्स पाण्याचा प्रवाह रात्री दोन ते अडीच वाजता मन्याड धरणातून पास होत आहे. या कारणाने गिरणा नदीला पूर आला आहे. प्रशासनाकडून नदी काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.काल रात्री मन्याड धरणाच्या वरील बाजूस ढगफुटी सदृष्य पाऊस झाल्याने पाणी गिरणा नदीत येऊन मिळत आहे. त्यामुळे गिरणा नदीला मोठा पूर आला आहे. चाळीसगाव भडगाव पाचोरा जळगाव तालुक्यातील नदी काठावरील गावांना धोक्याचा इशारा दिलेला आहे. बहुळा व हिवरा धरण सुद्धा पूर्ण क्षमतेने भरले असून त्यामधून दहा हजार पेक्षा जास्त पाणी सोडले जात आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.