जळगाव ः शहरातील सर्व रस्त्यांची अवस्था ही दयनीय झाली असून जागोजागी खड्डे झाले आहे. त्यामुळे शहरातील नागरीक कमालिचे त्रस्त झाले असून महापालिका प्रशासन रस्ता दुरूस्तीचे काम का करत नाही याचा जाब विचारण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे महापालिकेवेर (Jalgaon Municipal Corporation) आज दुपारी मार्चा (Ncp Movement) काढला. तसेच शिवसेनेचे महापौर (Mayor),आयुक्तांना ( Commissioner) घेराव घालत पंधरा दिवसात रस्ते दुरुस्तीच्या कामाला सुरवात न झाल्यास मोठे कुलूप आणून महापालिका लावू असा इशारा यावेळी दिला.
जळगाव शहरात अमृत योजने अंतर्गत नविन जलवाहिनीचे तसेच भुमीगत मलनिस्सारण व गटारीचे काम सुरू आहे. त्यामुळे संपूर्ण रस्ते खोदले गेलेले आहे. परंतू हे रस्ते व्यवस्थीत बुझविले नसल्याने तसेच पावसामुळे खराब झालेले रस्ते दुरुस्ती महापालिका प्रशासन करत नसल्याने नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. याबाबत आज राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक भूमीका घेतली. महानगराध्यक्ष अभिषेक पाटील यांच्या नेतृत्वाखाली जळगाव महापालिकेवर धडक मोर्चा काढण्यात आला.
महापौर, उपमहापौरांनी दिले आश्वासन
राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे महापालिकेच्या आवारात महापालिका प्रशासना विरोधात जोरदार घोषणा देवून परिसर दणाणून सोडला. यावेळी महापौर जयश्री महाजन, उपमहापौर कुलभूषण पाटील यांनी येवून आंदोलकांना पावसाळा असल्याने कामे होणार नसून टेंडर प्रक्रिया सुरु असल्याचे सांगितले असता राष्ट्रवादीने जोरदार घोषणाबाजी करीत राजकीय आश्वासन नको प्रशासकीय आदेश द्या अशी मागणी केली.
आयुक्त साहेब राजीनामा द्या...
राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी आंदोलनात आयुक्त साहेब राजीनामा द्या या अशा घोषणा दिल्या. मनपा आयुक्त सतीश कुलकर्णी यांनी खाली येत सर्वांशी चर्चा करून लवकरत रस्ते दुरुस्तीचे काम सुरू करू असे आश्वासन दिले. तर राष्ट्रवादीने पंधरा दिवसात रस्ते दुरुस्तीच्या कामाला सुरवात नाही झाली तर मोठे कुलूप आणून महापालिकेला लावू असा इशारा देखील दिला. तसेच मागण्यांचे निवेदन देखील देण्यात आले.
जळगाव शहरातील खड्डेमय रस्त्यांमूळे नागरिक प्रचंड त्रस्त असून महापालिका प्रशासनातील आधिकारी काम करत नसून त्यांना काढून अथवा सक्तीच्या रजेवर पाठविले पाहिजे. रस्त्यांसाठी निधी पडून असून देखील रस्ते दुरुस्ती महापालिका प्रशासन करत नसून जर ते काम करत नसतील त्यांना काढून टाका आणि शहरातील शेकडो इंजिनीअर तरुण असून त्यांच्याकडून काम करू घ्या. ते काम करण्यास तयार आहे. राज्यात महाविकार आघाडी असून शिवसेना आमचा मित्र पक्ष असला तरी शहरातील समस्या बाबत राष्ट्रवादी पक्ष आवाज उठवीणारच
- अभिषेक पाटील, महानगराध्यक्ष. राष्ट्रवादी काँग्रेस
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.