चिखलात ‘रुतले’ जीवनाचे चाक..आणि खड्यांनी घेतला गृहस्थाचा बळी

Jalgaon Accident News :अपघाताची माहिती कळताच कुटुंबीय नातेवाईक आणि गल्लीतील रहिवाशांनी जिल्हा रुग्णालयात धाव घेतली.
Accident
Accident
Updated on
Summary

जळगाव शहरातील व्हीआयपी रहिवास असलेल्या महाबळ रेाड सोडला तर, संपूर्ण शहर चिखलात गाडले गेल्याची परिस्थिती आहे.


जळगाव : अमृत योजना, भूमिगत गटारींसाठी खोदलेले खड्डे व्यवस्थित न बुजवल्याने पावसात या खड्ड्यामुळे वाहने घसरून होणारे अपघात नित्याचे झाले आहे. मंगळवारी अशाच एका खड्ड्यात रुतलेल्या सायकलचे चाक काढताना ट्रॅक्टरचालकाने सायकलस्वारास चिरडल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. सुरेश देविदास सोमवंशी (वय ५५, रा. कासमवाडी) असे मयताचे नाव आहे.

Accident
सावदा, यावल, कुंभारखेडा, आचेगावला अवैध सावकारांवर छापे


सुरेश सोमवंशी (वय ५५) हे कासमवाडीतील रहिवासी शिलाई मशीन दुरुस्तीची कामे करतात. मंगळवारी सकाळी ते जामा मशीद जवळील त्यांच्या दुकानावर गेले. नेहमीप्रमाणे दुकानावर काम आटोपून सकाळी १०.३० वाजेच्या सुमारास जेवणासाठी घरी येत असताना कब्रस्थान रोडवरील चिखलात सायकलचे चाक रुतले, खाली उतरून सायकल ओढत असतानाच महापालिका ठेकेदाराचे कचरा उचलणाऱ्या ट्रॅक्टरच्या (एमएच १९ एपी ७३३०) मागील चाकाखाली सुरेश सोमवंशी सायकलसह चिरडले गेले. त्यांचा या अपघातात जागीच मृत्यू झाला. परिसरातील नागरिकांनी धाव घेऊन मृतदेह जिल्हा शासकीय रुग्णालयात आणला. डॉक्टरांनी तपासणीअंती त्यांना मृत घोषित केले. एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.

Accident
मंदाकिनी खडसेंना ईडीचे समन्स;आज होणार चौकशी



कुटुंबीयांचा आक्रोश
सुरेश सोमवंशी यांच्या अपघाताची माहिती कळताच कुटुंबीय नातेवाईक आणि गल्लीतील रहिवाशांनी जिल्हा रुग्णालयात धाव घेतली. त्याचा मृत्यू झाल्याचे कळताच कुटुंबीयांनी एकच हंबरडा फोडला. मयत सोमवंशी यांच्या पश्चात पत्नी नूतन, मुलगी प्रणाली आणि मुलगा हर्षल असा परिवार आहे. मुलगा पुण्याला असतो.

Accident
केंद्रीय मंत्री पवारांची आजपासून धुळे,नंदुरबारला जनआशीर्वाद यात्रा

जिवघेणे खड्डे अन्‌ चिखल
जळगाव शहरात सर्वच रस्ते अमृत योजना व भूमिगत गटारींच्या नावे खोदून ठेवले आहे. रस्ते खणल्यावर बुजवून रस्ता व्यवस्थित करण्याची जबाबदारी संबंधित ठेकेदारांची असताना या खड्डयाची जबाबदारीच कुणी घ्यायला तयार नाही. कुणाचा जीव गेला, की तात्पुरती डागडुजी होते. पुन्हा जैसे थे अवस्था असते. शहरातील व्हीआयपी रहिवास असलेल्या महाबळ रेाड सोडला तर, संपूर्ण शहर चिखलात गाडले गेल्याची परिस्थिती आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.