जळगाव ः शहरातील अमृत योजनेचे (Water Supply Amrut Yojana) काम ८२ टक्के पूर्ण झाले आहे. आगामी दोन महिन्यात काम पूर्ण होईल अशी माहिती महापालिकेचे आयुक्त सतीश कुलकर्णी (Municipal Commissioner Satish Kulkarni) यांनी दिली. ‘दिशा’ समितीच्या (Direction’ Committee) बैठकीत दिली.
श्री. कुलकर्णी यांनी सांगितले, की शहरात अमृत योजनेंतर्गत पाणीपुरवठा व भुमिगत गटारी ही कामे हाती घेण्यात आली आहे. पाणीपुरवठा योजनेचे काम ८२ टक्के झाले. पाणीपुरवठा योजनेत ६ पाण्याच्या टाक्या ५८६ किलोमिटरची पाईपलाईनचे काम आहे. तीन पाण्याच्या टाक्या बांधून झाल्या. तीन टाक्या व जलवाहिनीचे काम आगामी दोन महिन्यात पूर्ण होईल. भुमिगत गटारीचे काम ६० टक्के झाले आहे. आता नाल्यांवरील कामे बाकी आहेत. त्यावर खासदार पाटील यांनी तुम्ही दोन महिन्यात काम पूर्ण होइल असे सांगताहेत ते पूर्ण होणे गरजेचे आहे किती वेळ नागरिकांच्या अनेक प्रश्नांना आम्ही उत्तरे देणार, दोन महिन्यात काम पूर्ण न झाल्यास कंत्राटदारवर कारवाई करण्याच्या सूचना देण्यात आल्या.
शहरातील महामार्गाचे चौपदरीकरणाचे काम ८५ टक्के पूर्ण झाले आहेत. ते डिसेंबर अखेर पूर्ण होईल. पावसामुळे काम संथगतीने झाल्याची सांगण्यात आले. सुरू असलेल्या कामामुळे अनेक ठिकाणी वाहतुकीची कोंडी होत असल्याच्या तक्रारी आहेत. त्यावर आता कामाचा वेग वाढविण्यात येणार असून डिसेंबरपर्यत काम पूर्ण होईल, अशी माहिती राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी दिली.
भुसावळचा डीपीआर सुरूच..
भुसावळ अमृत योजनेचा अजून डीपीआर बनविणे सुरूच आहे. काम ५३ टक्के पूर्ण झाले. मार्च पर्यंत टाक्यांचे काम पूर्ण होईल. दोन अडीच वर्षापासून भुसावळ अमृत योजनेचे काम अपूर्ण असल्याने कंत्राटदाराबाबत संताप व्यक्त करण्यात आला. अमृत योजनेच्या ज्या ठिकाणावरून पाणी उचलयाचे ते ठिकाण दोन वेळा बदलविण्यात आल्याने वेळ लागत असल्याचे सांगण्यात आले. अंतिम डीपीआर मुंबईत मंजुरीसाठी पाठविण्यात आल्याचे महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.