अपघातात दीपक व दिनेश या दोघांचा मृत्यू झाला. तर कृष्णाच्या डाव्या पायास व डोक्यास दुखापत झाली होती.
जळगाव ः शेंदुर्णी ते गोंदेगाव महामार्गावर (highway) दोन दुचाकी समोरा समोर धडकल्या (Acident) . या अपघातात दोन तरुण जागीच ठार झाले तर एक गंभीर जखमी झाला होता. अपघातातील जखमींसह मृतदेह शासकीय रुग्णालयात आणण्यात आले. जखमींचा जीव वाचवण्याची डॉक्टरांची धडपड सुरु असतांनाच दारुड्यांच्या हाणामारीत (Drunkards fights) जखमी रुग्णालयात आले. डॉक्टर कुठयं पहिले आमचा ईलाज करा..असे म्हणत देाघांसह आलेल्यांनी गोंधळ घातला. थोडे थांबा मध्ये शस्त्रक्रिया सुरु आहे असे समजुत घालण्यास आलेल्या दोघा डॉक्टरांना या तरुणांनी मारहाण करण्यास सुरवात केल्याने एकच गोंधळ उडाला.
शेंदुर्णी-गोंदेगाव दरम्यान झालेल्या अपघातात दीपक रामदास गायकवाड (वय २५, रा. गटामरी, ता. सिल्लोड, औरंगाबाद) व दिनेश मदन जाधव (वय २३, रा. गोंदगाव तांडा, शेंदुर्णी) असे मृतांची नावे आहेत. तर कृष्णा उत्तम सोनवणे (रा. डकला, ता. सिल्लोड, औरंगाबाद) असे जखमीचे नाव आहे. मृत दीपक व जखमी कृष्णा हे दोघे एकमेकांचे आतेभाऊ-मामेभाऊ आहेत. हे दोघे दुचाकीने (एमएच २० डीके २५४८) रविवारी दीपकची बहीण राधाबाई (जोगलखेडा) हिला भेटण्यासाठी आले होते. परत जात असताना त्यांच्या दुचाकीची धडक दिनेश जाधव यांच्या दुचाकीला बसली. या अपघातात दीपक व दिनेश या दोघांचा मृत्यू झाला. तर कृष्णाच्या डाव्या पायास व डोक्यास दुखापत झाली होती. सोमवारी उपचारा दरम्यान कृष्णाचाही मृत्यु ओढवला. शोकाकूल वातावरणात तिघांवर अंत्यसंस्कार करण्यात आले.
गोंधळात मारहाण
दोन्ही मृत व जखमींच्या नातेवाइकांनी रुग्णालयात गर्दी केली होती. नेमकी याच वेळी हरिविठ्ठलनगरात हाणामारीत जखमी झालेला संदीप बापू पाटील हाही उपचारासाठी रुग्णालयात आला होता. त्याच्यावर उपचार होत नसल्याने त्याने संताप व्यक्त केला. या वेळी संदीप याने डॉ. विपीन खडसे व डॉ. उमेश जाधव यांना मारहाण केली. प्रत्युत्तरात डॉक्टरांनीही या जखमीस मारहाण केल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकारामुळे रुग्णालयात गोंधळ उडाला होता. यानंतर जखमी संदीपवर उपचार करून त्याला पुन्हा रामानंदनगर पोलिस ठाण्यात पाठवण्यात आले. संदीप यानेही आपल्याला डॉक्टरांनीच मारहाण केल्याचा आरोप केला. रात्री बारा वाजता तो, दोन्ही डॉक्टरांची तक्रार नोंदवण्यासाठी जिल्हापेठ पेालिस ठाण्यात आला होता.
कुटूंबीयांचा आक्रोश
शेंदुर्णीजवळच्या अपघातातील मृतांच्या नातेवाइकांनी प्रचंड आक्रोश केला. रात्री ११.३० वाजता दोन्ही मृतदेह शवागारात नेण्यात आले. तर जखमी कृष्णाला खासगी रुग्णालयात हलवण्यात आले. एकाचवेळी देान वेगवेगळ्या घटनांमुळे झालेल्या गर्दीत जिल्हा रुग्णालयात एकच गोंधळ डाला.
वीज पुरवठा खंडीत
शेंदुणी अपघातातील मृतक, जखमींवर तातडीचे उपाचार सुरु असतांना अचानक रात्री ११-१८ वाजता विद्युत पुरवठा खंडीत झाला. अंधारात गोंधळ करणाऱ्यांचे बऱ्या पैकी फावल्याने गोंधळात भर पडली. हरिविठ्ठल भागातील संदिप पाटील याने डॉक्टरांनी आपल्याला मारहाण केल्याचा आरोप केला असून, प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहिती नुसार डॉक्टरांच्या छातीत एकाने बुक्का मारुन शिवीगाळ केल्यानंतर भांडणाला सुरवात झाली. डॉक्टरांना मारहाण होत असल्याचे माहिती पडल्यावर सुरक्षारक्षकांनी धाव घेतली.
चार आपत्ये पोरकी
अपघातात मृत झालेला दीपक गायकवाड याच्या पश्चात पत्नी उषाबाई, गणेश, हितेश व दिनेश हे तीन मुले व निकिता ही एक मुलगी आहे. अपघातात या चारही आपत्यांचे छत्र हरपले. दीपक हा शेतीकाम करून कुटूंबीयांचा उदरनिर्वाह करीत होता.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.