जळगाव : केंद्र सरकारने लागू केलेल्या नवीन कृषी कायद्यांविरोधात काँग्रेस आक्रमक झाली आहे. बहुमताच्या जोरावर शेतकरीविरोधात काळे कायदे पारित केले. त्याविरोधात संपूर्ण देशभरात मुख्यतः दिल्लीच्या सीमेवर शेतकऱ्यांनी आंदोलन उभारले आहे. या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी गुरुवारी जिल्हाभरात ठिकठिकाणी काँग्रेसतर्फे आंदोलन करण्यात आले. या वेळी तहसीलदारांना निवेदनही देण्यात आले.
शेतकरी आंदोलनास काँग्रेसचा पाठिंबा.
एरंडोल : केंद्र सरकारने बहुमताच्या जोरावर मंजूर केलेली कृषी विधेयके त्वरित रद्द करावीत, अशी मागणी कॉँग्रेस पदाधिकाऱ्यांनी तहसीलदार अर्चना खेतमाळीस यांना दिलेल्या निवेदनात केली आहे. कृषी विधेयकांच्या विरोधात दिल्ली येथे सुरू असलेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनास पक्षाचा पाठिंबा असल्याचे निवेदनात म्हटले आहे. केंद्र सरकारने ही कृषी विधेयके त्वरित रद्द करावीत, अन्यथा काँग्रेसतर्फे तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा निवेदनात देण्यात आला आहे. या वेळी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष विजय महाजन, शहराध्यक्ष संजय भदाणे, युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष इमरान सय्यद, शेतकी संघाचे संचालक प्रकाश ठाकूर, शेख सांडू शेख मोहम्मद, सुदर्शन महाजन, रईस अहमद, बबन वंजारी, नारायण ठाकूर, तुकाराम पाटील, श्रीकांत महाजन, मोहम्मद युसूफ शेख मोहम्मद, किशोर पाटील, संजय कलाल, रोहिदास मोरे, सुकराम भिल, राजेंद्र सोनवणे आदी उपस्थित होते.
चोपडा धरणे आंदोलन
चोपडा : तालुका व शहर काँग्रेसतर्फे जिल्हाध्यक्ष ॲड. संदीप पाटील यांच्या उपस्थितीत सकाळी साडेदहाला तहसील कार्यालयाच्या प्रांगणात केंद्र सरकारविरोधी आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी धरणे आंदोलन करण्यात आले. या वेळी जिल्हा खजिनदार सुरेश पाटील, तालुकाध्यक्ष राजाराम पाटील, शहराध्यक्ष के. डी. चौधरी, जिल्हा सरचिटणीस अजबराव पाटील, अमृत महाजन, नंदकिशोर सांगोरे, रमेश शिंदे, गोपाल धनगर, प्रदीप पाटील, किरण सोनवणे, चेतन बाविस्कर आदी कार्यकर्ते उपस्थित होते.
वाचा- वीस वर्षात पहिल्यांदा लोकप्रतिनीधी आले, समस्या देखिल जाणून घेतल्या याचा नागरिकांमध्ये झाला आनंद !
पारोळा काँग्रेसचा पाठिंबा
पारोळा : दिल्लीच्या शेतकरी आंदोलनास पारोळा तालुका काँग्रेसतर्फे जाहीर पाठिंबा देण्यात आला. या वेळी तालुकाध्यक्ष पीरनकुमार अनुष्ठान यांच्या नेतृत्वाखाली धरणे आंदोलन करण्यात आले. आंदोलनस्थळी आमदार चिमणराव पाटील यांनी भेट देऊन धरणे आंदोलनास पाठिंबा जाहीर केला. या वेळी जिल्हा काँग्रेसचे उपाध्यक्ष रामराव पाटील, तालुका काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष प्रा. संजय पाटील, अपंग सेनेचे तालुकाध्यक्ष बन्सीलाल पाटील, शेतकरी कोमल पाटील, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष सुनील पवार, योगेश पाटील, आनंदा अहिरे, बाळासाहेब पाटील, त्र्यंबक महाजन, राहुल पाटील आदी कार्यकर्ते उपस्थित होते.
भुसावळला निवेदन
भुसावळ : दिल्लीच्या आंदोलनाच्या समर्थनार्थ येथील जिल्हा काँग्रेस अनुसूचित जाती विभागाद्वारे प्रांताधिकारी रामसिंग सुलाने यांना निवेदन देण्यात आले. या वेळी उत्तर महाराष्ट्र काँग्रेसचे समन्वयक योगेंद्र पाटील, जिल्हा काँग्रेस कमिटी अनुसूचित जाती विभागाचे जिल्हा कार्याध्यक्ष विवेक नरवाडे, जिल्हा सरचिटणीस रहीम कुरेशी, शहर काँग्रेसचे उपाध्यक्ष इस्माईल गवळी, काँग्रेस अनुसूचित जाती विभागाचे शहराध्यक्ष सुनील जोहरे, उपाध्यक्ष विनोद पवार, कुणाल सुरळकर, राहुल कडेरे आदी उपस्थित होते.
रावेरला केंद्राचा निषेध
रावेर : तालुका काँग्रेसतर्फे येथील तहसील कार्यालयासमोर दिल्ली येथील शेतकऱ्यांनी उभारलेल्या आंदोलनास पाठिंबा देण्यासाठी तसेच केंद्र सरकारच्या निषेधार्थ धरणे आंदोलन करण्यात आले. या वेळी एस. आर. चौधरी, ज्ञानेश्वर महाजन, प्रतिभा मोरे, कांता बोरा, मनीषा पाचपांडे, मानसी पवार, डॉ. शब्बीर खाटीक, संतोष पाटील, राजू सवर्णे, यशवंत महाजन, शिवाजी येवले, दिलरुबाब तडवी, प्रतीक खराले, यशवंत धनके यांच्यासह काँग्रेसचे सुमारे २५ पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते. तहसीलदार उषाराणी देवगुणे यांना निवेदन देऊन आंदोलन शांततेत झाले.
मुक्ताईनगरला आंदोलन
मुक्ताईनगर : दिल्लीतील आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी मुक्ताईनगर तालुका काँग्रेसतर्फे मुक्ताईनगर तहसील येथे धरणे आंदोलन करण्यात आले. या वेळी जिल्हा उपाध्यक्ष एस. ए. भोईसर, जिल्हा सरचिटणीस डॉ. जगदीश पाटील, तालुकाध्यक्ष आत्माराम जाधव, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष यू. डी. पाटील, शिवसेनेचे तालुकाप्रमुख छोटू भोई, काँग्रेसचे शहराध्यक्ष पवन खुरपडे, जिल्हा सरचिटणीस संजय पाटील, आसिफ खान, मागासवर्गीय विभागाचे जिल्हा उपाध्यक्ष बी. डी. गवई, शिवसेना जिल्हा अल्पसंख्याक उपाध्यक्ष अफसर खान, शिवसेना शहरप्रमुख प्रशांत टोणगे, युवक काँग्रेसचे विधानसभा क्षेत्र अध्यक्ष नीरज बोराखडे, नगरपंचायत गटनेते राजेंद्र हिवराळे, काँग्रेसचे तालुका उपाध्यक्ष दिनेश पाटील आदी उपस्थित होते.
संपादन- भूषण श्रीखंडे
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.